मजकुराकडे जा
City News Mumbai
लोकल न्यूज

भिवंडीत ८० हजार रुपये मूल्याचे १७ ग्राम मेफेड्रोन जप्त, दोन आरोपींना अटक

City News Mumbai1 मिनिटांत वाचा

तिसऱ्याचा शोध सुरू, भारत कंपाऊंडमध्ये शांतीनगर पोलिसांची कारवाई

सिटी न्यूज मुंबई/गणी खान

भिवंडीतील अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यवसायाविरोधात कारवाई करत शांतीनगर पोलिसांनी भारत कंपाऊंड परिसरात छापा टाकून ८० हजार २०० रुपये मूल्याचे १७ ग्राम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त केले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन तरुणांना अटक केली असून, या प्रकरणातील गोलू नावाच्या तिसऱ्या संशयिताचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:१३ वाजेच्या सुमारास भारत कंपाऊंड येथील सबका हॉटेलजवळ पोलिसांनी कारवाई केली. यादरम्यान फैजान जमील अहमद अंसारी (२४), रा. सुभाषनगर आणि अन्वर युसुफ शेख (३०), रा. गुलजारनगर, भिवंडी यांच्या ताब्यातून १७ ग्राम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. पोलिसांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत ८० हजार २०० रुपये निश्चित केली आहे. तपासात गोलू नावाच्या आणखी एका व्यक्तीचा सहभाग समोर आल्यानंतर त्यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(सी) आणि २१(बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी आणि फरार संशयिताचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.