जिला और शहर कांग्रेस के निष्ठावान पदाधिकारी और कार्यकर्ताओं पर अन्याय
City News Mumbai••5 व्यूज़•2 मिनट पढ़ें
बालाजी चव्हाण की कांग्रेस महाराष्ट्र सहप्रभारी रिहाना चिश्ती को गंभीर शिकायत
नांदेड :- (प्रतिनिधी) -
नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलून खा.रवींद्र चव्हाण यांनी मोठा अन्याय केला असून आयाराम गयारामांची महत्वाच्या पदांवर वर्णी करून पक्षाला भाजपच्या दावणीला बांधले आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्यावा अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी बालाजी चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र सह प्रभारी रिहाना चिश्ती यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. नांदेड दौर्यावर आलेल्या रिहाना चिश्ती यांची प्रत्यक्ष भेट घेवून बालाजी चव्हाण यांनी निवेदन सादर केले की, मागील २ वर्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये भाजप पक्षाचे स्पीपर सेल म्हणून (बी. टीम) काम करणार्या बंडखोर कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाच्या खा. रविंद्र चव्हाण यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बंडखोरांना पदे दिली असल्यामुळे काँग्रेस पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकार्यांचे मन दुखावले असून त्यांच्यावर अन्याय केला आहे. मागील 13 नगरपालीकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही, अनेक ठिकाणी उमेदवारच मिळाले नाहीत आणि ज्या लोकांना उमेदवारी देण्यात आली ते उमेदवार मोठ्या मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत. खा.रविंद्र चव्हाण यांच्या लोकसभा मतदार संघामध्ये एकही नगरपालिका व नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष निवडुन आलेला नाही तसेच 185 जागांवर उमेदवारी दिली पण केवळ 47 नगरसेवक निवडुन आले व बाकी सर्व उमेदवारांचा पराभव झाला. पक्षाचा एकही स्टार प्रचारक प्रचारासाठी बोलावण्यात आले नाही. त्यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकी मध्ये सुद्धा अशाच प्रकारचे गलीच्छ राजकारण करून काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले आणि आवश्यकता नसताना वंचित बहुजन आघाडी सोबत युती करून काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांवर विशेषतः बहुजन समाजातील कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय करण्यात आला. त्यामुळे पक्षातील अनेक बहुजन पदाधिकारी पक्ष सोडून इतर पक्षामध्ये गेले तर काही जण घरी बसले आणि पक्षातील कार्यकर्त्यांना ए.बी. फॉर्म देताना अनेक चुका केल्यामुळे सर्वच समाजाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याने समाज त्यांच्यावर प्रचंड नाराज होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज हा काँग्रेसपासून दूर गेला आणि नांदेड महानगरपालीका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून ३ ते ४ वेळेस निवडुन आलेले नगरसेवक काँग्रेस पक्ष सोडून एमआयएम मध्ये गेले. त्याठिकाणी एम.आय.एम पक्षाचे १४ नगरसेवक निवडुन आले. त्यातील बहुतांश नगरसेवक हे काँग्रेसचेच होते. मा. शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांना काँग्रेस पक्षाने महापौर, विरोधी पक्ष नेता, विधानसभेचे उमेदवारी दिली व त्यांचा मुलगा अब्दुल गफ्फार हे उपमहापौर होते. एवढे सर्व एकाच परिवारात दिल्यामुळे मुस्लिम समाजातील इतर पदाधिकारी नाराज होवून काँग्रेस पक्ष सोडून गेले. शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांना विधानसभेची उमेदवारी दिल्यानंतर सुद्धा त्यांनी कोणत...