समता नगर पोलिसांची मोठी कारवाई, २० बांगलादेशी नागरिकांना घेतले ताब्यात; १४ महिलांचा समावेश


मुंबई, दि. ७ नोव्हेंबर (सिटी न्यूज मुंबईकासिम सैय्यद/मतिबुल्ला शेख)
मुंबईच्या कांदिवली भागातील समतानगर पोलिसांनी मेफेड्रोन (MD) ड्रग्ज तस्करीत मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून २३९ ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले असून, ज्याची अंदाजे किंमत सुमारे ९.९९ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली पूर्वेतील भाजीवाडी, बिहारी टेकडी, पोयसर भागात मेफेड्रोन ड्रग्जची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती समतानगर पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी जाळे रचून कारवाई केली. यादरम्यान आरोपी माला हरिश्चंद्र राय, अविनाश मोहननाथ झा उर्फ लोटा आणि पूजा राय यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईल फोनच्या तांत्रिक तपासावरून माला राय आणि अविनाश उर्फ लोटा हे तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांचे एक पथक तमिळनाडूला पोहोचले आणि २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख:
* माला हरिश्चंद्र राय (२७ वर्षे) – रा. रामशंकर सिंग चाळ, भाजीवाडी, कांदेवली रोड, पोयसर, कांदिवली पूर्व, मुंबई.
* अविनाश मोहननाथ झा उर्फ लोटा (३५ वर्षे) – रा. जांगीड सिंग चाळ, भाजीवाडी, बिहारी टेकडी, पोयसर, कांदिवली पूर्व, मुंबई.
पोलिसांच्या कारवाईत २३९ ग्रॅम मेफेड्रोन, ज्याची अंदाजे किंमत ९.९९ लाख रुपये आहे, रोख रक्कम आणि वजनाचा काटा जप्त करण्यात आल्याचा उल्लेख आहे. याशिवाय आरोपींशी संबंधित ठिकाणाहून २.५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
या प्रकरणी एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि समतानगर पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस अधिकारी आणि तपास पथकाच्या प्रयत्नांमुळे या ड्रग्ज प्रकरणात आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आले.
ड्रग्जविरोधातील मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या काळ्या धंद्यावर वेसण घालण्याच्या दिशेने महत्त्वाचे यश मिळाले आहे.

संस्थापक व मुख्य संपादक | सिटी न्यूज मुंबई







