मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२६
Englishहिन्दीMarathi
City News Mumbai
City News Mumbai
मुख्यपृष्ठई-पेपरव्हिडिओराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान
टॉपराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान

सिटी न्यूज मुंबई

मुंबईची प्रत्येक बातमी, सर्वात आधी

श्रेणी

  • स्थानिक
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • व्यवसाय
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • आरोग्य
  • शिक्षण

जलद दुवे

  • मुख्यपृष्ठ
  • ई-पेपर
  • व्हिडिओ
  • आजची छायाचित्र
  • आमच्याबद्दल
  • संपर्क करा
  • गोपनीयता धोरण
  • सेवा अटी

न्यूजरूम

  • संपादकीय धोरण
  • सुधारणा आणि तक्रारी
  • आमच्याशी जाहिरात
  • न्यूजरूम संपर्क

भाषा

  • English
  • हिन्दी (Hindi)
  • मराठी (Marathi)

आम्हाला फॉलो करा

Email: citynewsmumbai@gmail.com

Phone: 9869128483

© 2026 City News Mumbai. सर्व हक्क राखीव

Designed and Developed byZeloiteZeloite
राज्यातील दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन
  1. मुखपृष्ठ
  2. मुंबई
मुंबई

राज्यातील दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन

City News Mumbai•२२ सप्टेंबर, २०२६ रोजी ०८:४८ AM वाजता•9 व्ह्यूज•1 मिनिट वाचा



राज्यातील दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. महसूल मंत्री अध्यक्ष. वेळोवेळी घ्याव्या लागणाऱ्या निर्णयासाठी मंत्रिमंडळ उपसमितीला सर्वाधिकार. येत्या शनिवारपर्यंत प्राथमिक अधिसूचना काढण्यात येणार. मंत्री बांधावर जाऊन पाहणी करणार. शेतकऱ्यांपर्यत मदत पोहचवण्याच्या कामात गतीमानता येणार. (मदत व पूनर्वसन विभाग)

मुंबई मेट्रो मार्ग ४, ४ अ व १० प्रकल्पाच्या एकात्मिक कार शेड डेपो करिता जमीन दिलेल्या मौजे मोघरपाडा येथील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना मालकी हक्काने विकसित भूखंड वाटप करण्यास मंजुरी. मोघरपाडा सर्व्हे क्र. ३० मधील शेतकऱ्यांना २२.५ टक्के व १२.५ टक्के विकसित भूखंड वाटप होणार.
(नगर विकास विभाग)

मुंबईतील खार (प) येथील रामकृष्णनगर मधील म्हाडाच्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास होणार. पायाभूत सुविधा दर्जेदार मिळाव्यात यासाठी या परिसरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या या इमारतींचा समूह पुनर्विकास होणार. (गृहनिर्माण विभाग)

धुळे शहराच्या मंजूर विकास योजनेतील धुळे महानगरपालिका हद्दीतील मौजे देवपूर (ता. धुळे) येथील सर्व्हे क्र. १०३ वरील क्रीडांगण व बगीचा यांचे आरक्षण रद्द करून, ते सार्वजनिक – निमसार्वजनिक विभागात समाविष्ट करण्यास मान्यता (नगर विकास विभाग)

कृषि विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द. सन २००९ चा मंजूर आकृतीबंध तात्पुरता कायम राहणार. सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाच्या कार्यभाराचा, उपलब्ध मनुष्यबळाचा, रिक्त पदांचा, विविध संवर्गाच्या आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणेची गरज, शेतकरी केंद्रीत योजनांचा कार्यभार तसेच भविष्यातील प्रशासकीय गरजा यांचा सर्वंकष आढावा घेण्यात येणार (कृषि विभाग)
00000
शेअर करा:

More from मुंबई

मुंबई उपनगरात गणेश मंडळांच्या माध्यमातून लोकसंवादाचा जागर
मुंबई

मुंबई उपनगरात गणेश मंडळांच्या माध्यमातून लोकसंवादाचा जागर

२२ सप्टें, २०२६
टाटा, महिंद्रा सहित नामवंत कंपन्या रोजगार महाकुंभात सहभागी होतील
मुंबई

टाटा, महिंद्रा सहित नामवंत कंपन्या रोजगार महाकुंभात सहभागी होतील

२२ सप्टें, २०२६
महाराष्ट्रासाठी ‘जागतिक कार्यबल गतीशिलता धोरण २०२६’ जाहीर
मुंबई

महाराष्ट्रासाठी ‘जागतिक कार्यबल गतीशिलता धोरण २०२६’ जाहीर

२१ सप्टें, २०२६
प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; ‘रशियन तेलावरून अमेरिकेसमोर सरेंडर का?’ असा सवाल
मुंबई

प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; ‘रशियन तेलावरून अमेरिकेसमोर सरेंडर का?’ असा सवाल

२१ सप्टें, २०२६
डावूद इब्राहिम जिवंत आहे का?
मुंबई

डावूद इब्राहिम जिवंत आहे का?

१९ सप्टें, २०२६
डकैतीची तयारी करणाऱ्या अंतरराज्यीय गिरोहातील ५ आरोपी अटक, शस्त्र व कार जप्त
मुंबई

डकैतीची तयारी करणाऱ्या अंतरराज्यीय गिरोहातील ५ आरोपी अटक, शस्त्र व कार जप्त

१७ सप्टें, २०२६