सोमवार, २८ सप्टेंबर, २०२६
Englishहिन्दीMarathi
City News Mumbai
City News Mumbai
मुख्यपृष्ठई-पेपरव्हिडिओराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान
टॉपराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान

सिटी न्यूज मुंबई

मुंबईची प्रत्येक बातमी, सर्वात आधी

श्रेणी

  • स्थानिक
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • व्यवसाय
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • आरोग्य
  • शिक्षण

जलद दुवे

  • मुख्यपृष्ठ
  • ई-पेपर
  • व्हिडिओ
  • आजची छायाचित्र
  • आमच्याबद्दल
  • संपर्क करा
  • गोपनीयता धोरण
  • सेवा अटी

न्यूजरूम

  • संपादकीय धोरण
  • सुधारणा आणि तक्रारी
  • आमच्याशी जाहिरात
  • न्यूजरूम संपर्क

भाषा

  • English
  • हिन्दी (Hindi)
  • मराठी (Marathi)

आम्हाला फॉलो करा

Email: citynewsmumbai@gmail.com

Phone: 9869128483

© 2026 City News Mumbai. सर्व हक्क राखीव

Designed and Developed byZeloiteZeloite
दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत ‘अनमॅप्ड’ मतदारांकडील कागदपत्रे बीएलओ घरी जाऊन घेणार
  1. मुखपृष्ठ
  2. राष्ट्रीय
राष्ट्रीय

दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत ‘अनमॅप्ड’ मतदारांकडील कागदपत्रे बीएलओ घरी जाऊन घेणार

City News Mumbai•२७ सप्टेंबर, २०२६ रोजी ०४:११ AM वाजता•0 व्ह्यूज•2 मिनिट वाचा

अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR - Special Intensive Revision) प्रक्रियेला भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगाने आज झालेल्या बैठकीत दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवली आहे. प्राप्त नोटिसा, दावे व हरकती निकाली काढण्यासाठी १० नोव्हेंबर २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली असून, महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

*बीएलओ घरी जाऊन कागदपत्रे संकलित करणार*

विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान ‘जुळणी न झालेले मतदार’ (Unmapped) किंवा ‘तार्किक विसंगती’ (Logical Discrepancies) या कारणांमुळे ज्या नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशा मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आवश्यक कागदपत्रे संकलित करतील.

*प्रत्यक्ष सुनावणीसाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही*

कागदपत्रांचे संकलन घरातूनच करण्यात येणार असल्याने संबंधित मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी मतदार नोंदणी अधिकारी (ERO) किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेतली जाईल. अशा सुनावणीस मतदाराच्या वतीने कुटुंबातील कोणताही प्रौढ सदस्य उपस्थित राहू शकणार आहे.

*बेघर, मजूर व गरजू नागरिकांसाठी विशेष मदत कक्ष*

राज्यातील बेघर नागरिक, मजूर, गरीब तसेच रात्र निवाऱ्यांमध्ये (Night Shelters) राहणाऱ्या नागरिकांना मतदार नोंदणी व मतदार यादीतील दुरुस्तीच्या प्रक्रियेत सुलभता मिळावी, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना (DEO) गरजेनुसार विशेष मदत कक्ष (Help Desks) आणि विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
0000
शेअर करा:

More from राष्ट्रीय

निवडणूक आयोगाची नवीन पहल: पारदर्शकता आणि कार्यक्षमता यांच्याकडे पाऊल
राष्ट्रीय

निवडणूक आयोगाची नवीन पहल: पारदर्शकता आणि कार्यक्षमता यांच्याकडे पाऊल

२५ सप्टें, २०२६
चुनाव आयोग: 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकांची पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्याची भूमिका
राष्ट्रीय

चुनाव आयोग: 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकांची पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्याची भूमिका

२५ सप्टें, २०२६
चुनाव आयोगाचे नवीनतम पाऊल: पारदर्शकता आणि कार्यक्षमतेच्या दिशेने
राष्ट्रीय

चुनाव आयोगाचे नवीनतम पाऊल: पारदर्शकता आणि कार्यक्षमतेच्या दिशेने

२५ सप्टें, २०२६
अमित शाह: राजकारणाचे पथप्रदर्शक आणि गृहमंत्रीची यात्रा
राष्ट्रीय

अमित शाह: राजकारणाचे पथप्रदर्शक आणि गृहमंत्रीची यात्रा

२४ सप्टें, २०२६
अमित शाह: रणनीती आणि राजकारणाचा संगम
राष्ट्रीय

अमित शाह: रणनीती आणि राजकारणाचा संगम

२४ सप्टें, २०२६
अमित शाह: भारतीय राजकारणात सुरक्षा व प्रशासनाचे प्रमुख चेहरा
राष्ट्रीय

अमित शाह: भारतीय राजकारणात सुरक्षा व प्रशासनाचे प्रमुख चेहरा

२४ सप्टें, २०२६