मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२६
Englishहिन्दीMarathi
City News Mumbai
City News Mumbai
मुख्यपृष्ठई-पेपरव्हिडिओराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान
टॉपराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान

सिटी न्यूज मुंबई

मुंबईची प्रत्येक बातमी, सर्वात आधी

श्रेणी

  • स्थानिक
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • व्यवसाय
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • आरोग्य
  • शिक्षण

जलद दुवे

  • मुख्यपृष्ठ
  • ई-पेपर
  • व्हिडिओ
  • आजची छायाचित्र
  • आमच्याबद्दल
  • संपर्क करा
  • गोपनीयता धोरण
  • सेवा अटी

न्यूजरूम

  • संपादकीय धोरण
  • सुधारणा आणि तक्रारी
  • आमच्याशी जाहिरात
  • न्यूजरूम संपर्क

भाषा

  • English
  • हिन्दी (Hindi)
  • मराठी (Marathi)

आम्हाला फॉलो करा

Email: citynewsmumbai@gmail.com

Phone: 9869128483

© 2026 City News Mumbai. सर्व हक्क राखीव

Designed and Developed byZeloiteZeloite
महसुलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात !केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला ५० लाखांचे अनुदान
  1. मुखपृष्ठ
  2. राष्ट्रीय
राष्ट्रीय

महसुलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात !केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला ५० लाखांचे अनुदान

City News Mumbai•२२ सप्टेंबर, २०२६ रोजी ०४:०३ AM वाजता•0 व्ह्यूज•2 मिनिट वाचा

*महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे केंद्रीय सचिवांकडून कौतुक.*

मुंबई : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या मॉडेल नोंदणी कार्यालयांच्या उपयोगितेची दखल केंद्र सरकारने घेतली असून, पुणे येथे सुरू झालेले मॉडेल नोंदणी कार्यालय आता देशभर प्रारंभ करण्याचे निर्देश केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागाने दिले आहेत.
विशेष म्हणजे, केंद्रीय भू-संसाधन विभागाचे सचिव नरेंद्र भूषण यांनी अशी कार्यालये देशभर सुरू करण्यासाठी प्रत्येक कार्यालयासाठी ५० लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले.
केंद्रीय भू-संसाधन विभागाचे सचिव नरेंद्र भूषण यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित 'केंद्रीय नोंदणी विधेयक, २०२६' संदर्भात सर्व राज्यांच्या नोंदणी महानिरीक्षकांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक रविंद्र बिनवडे व उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे उपस्थित होते. या बैठकीत प्रस्तावित विधेयकातील तरतुदी, संभाव्य परिणाम आणि राज्यस्तरावरील सुधारणांबाबत सविस्तर चर्चा करून राज्यांचे अभिप्राय व सूचना जाणून घेण्यात आल्या.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी व मुद्रांक विभागाने महसूलवाढीसोबतच नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना यशस्वीपणे राबविले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्यावर,” सर्व राज्यांनी असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत.”
महाराष्ट्राच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने सुरू केलेल्या 'एक जिल्हा, एक नोंदणी', 'ई-प्रमाण', पासपोर्ट कार्यालयांच्या धर्तीवर उभारलेली 'आदर्श कार्यालये' आणि 'ई-नोंदणी' यांसारख्या गतिमान उपक्रमांचे केंद्रीय सचिवांनी विशेष कौतुक केले.

कोट
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'डिजिटल इंडिया' संकल्पनेला गती देत, नागरिकांच्या सोयीसाठी भविष्यातही अधिक लोकाभिमुख आणि तंत्रज्ञानाधिष्ठित सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने पुणे येथे सुरू झालेल्या मॉडेल कार्यालयाची दखल केंद्राने घेतली. यातूनच या कार्यालयाची उपयोगात लक्षात येते."
*चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री*


*•आदर्श दुय्यम निबंधक कार्यालयाची रचना*
• पुणे येथील कोथरूड भागात महाराष्ट्रातील पहिले कार्यालय सुरू
•पहिल्या टप्प्यात राज्यात आदर्श दुय्यम निबंधक कार्यालये
• मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या सहा प्रमुख जिल्ह्यांमधील मुख्यालयांच्या ठिकाणी ३० नवीन आदर्श कार्यालये
* 'स्लॉट बुकिंग'द्वारे अत्यंत जलद दस्त नोंदणी.
* हाय-स्पीड स्कॅनिंगद्वारे त्वरित डिजिटल दस्त रेकॉर्ड.
* अत्याधुनिक बायोमॅट्रिकद्वारे जलद डिजिटल ओळख पडताळणी.
* एकाच दिवसात दस्त नोंदणी व पावती.
* कागदपत्रांची पूर्व तपासणी करून त्रुटींचे निवारण.
* हेल्पडेस्कद्वारे प्रवेशापासून अर्ज भरेपर्यंत वैयक्तिक मार्गदर्शन.
* डिजिटल टोकन आणि स्क्रीनवर थेट डिस्प्ले.
* आरामदायी सोफे असलेले सुसज्ज वातानुकूलित प्रतीक्षालय.
* सर्व नागरिकांना विनामूल्य हाय-स्पीड वाय-फाय सुविधा.
* स्वच्छ प्रसाधने, पिण्याचे पाणी .
शेअर करा:

More from राष्ट्रीय

महाराष्ट्र शिक्षणतज्ज्ञाची मुलगी नीला विके पाटील स्वीडनच्या संसदेत निवडली गेली
राष्ट्रीय

महाराष्ट्र शिक्षणतज्ज्ञाची मुलगी नीला विके पाटील स्वीडनच्या संसदेत निवडली गेली

२१ सप्टें, २०२६
राष्ट्रीय

२१ सप्टें, २०२६
राहुल गांधीचा इंदौरमधील मोहीम: नागरिकांकडून मिळालेला स्वागत
राष्ट्रीय

राहुल गांधीचा इंदौरमधील मोहीम: नागरिकांकडून मिळालेला स्वागत

२० सप्टें, २०२६
राहुल गांधीचे इंदौरमध्ये स्वागत: नवीन राजकीय गतिशीलतेवर चर्चा
राष्ट्रीय

राहुल गांधीचे इंदौरमध्ये स्वागत: नवीन राजकीय गतिशीलतेवर चर्चा

२० सप्टें, २०२६
राहुल गांधीचा इंदौर दौरा: कार्यक्रम, भाषण आणि राजकीय प्रभाव
राष्ट्रीय

राहुल गांधीचा इंदौर दौरा: कार्यक्रम, भाषण आणि राजकीय प्रभाव

२० सप्टें, २०२६
नरेंद्र मोदी: भारताच्या पंतप्रधानांच्या राजकीय प्रवास आणि धोरणांचे विश्लेषण
राष्ट्रीय

नरेंद्र मोदी: भारताच्या पंतप्रधानांच्या राजकीय प्रवास आणि धोरणांचे विश्लेषण

१९ सप्टें, २०२६