महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी मीरा-भाईंदर महापौर सहायता निधीतून २१ लाख रुपयांचा धनादेश भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व डोंबिवली विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
शेतकरी हा समाजाचा अन्नदाता असून, संकटाच्या काळात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. या भावनेतून मीरा-भाईंदर महापौर सहायता निधीतून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली गेली.
या मदतीसाठी योगदान देणाऱ्या मीरा-भाईंदर शहरातील सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले. या आर्थिक मदतीमुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांना व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी मीरा-भाईंदरचे उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप जैन, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील, नगरसेविका वंदना भावसार व नगरसेवक भगवती शर्मा उपस्थित होते.