दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मीरा-भाईंदर महापौर सहायता निधीतून २१ लाखांची मदत
City News Mumbai••29 व्यूज़•1 मिनट पढ़ें
मीरा-भाईंदर, दि. १८ ऑक्टोबर (सिटी न्यूज़ मुंबई)
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी मीरा-भाईंदर महापौर सहायता निधीतून २१ लाख रुपयांचा धनादेश भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवली विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
शेतकरी हा समाजाचा अन्नदाता असून, संकटाच्या काळात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. याच भावनेतून मीरा-भाईंदर महापौर सहायता निधीतून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही मदत देण्यात आली.
या मदतीसाठी योगदान देणाऱ्या मीरा-भाईंदर शहरातील सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले. या आर्थिक मदतीमुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी मीरा-भाईंदरचे उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप जैन, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील, नगरसेविका वंदना भावसार आणि नगरसेवक भगवती शर्मा उपस्थित होते.