गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६
Englishहिन्दीMarathi
City News Mumbai
City News Mumbai
मुख्यपृष्ठई-पेपरव्हिडिओराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञानअपराधइतिहास
टॉपराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञानअपराधइतिहास

सिटी न्यूज मुंबई

मुंबईची प्रत्येक बातमी, सर्वात आधी

श्रेणी

  • स्थानिक
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • व्यवसाय
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • आरोग्य
  • शिक्षण

जलद दुवे

  • मुख्यपृष्ठ
  • ई-पेपर
  • व्हिडिओ
  • आजची छायाचित्र
  • आमच्याबद्दल
  • संपर्क करा
  • गोपनीयता धोरण
  • सेवा अटी

न्यूजरूम

  • संपादकीय धोरण
  • सुधारणा आणि तक्रारी
  • आमच्याशी जाहिरात
  • न्यूजरूम संपर्क

भाषा

  • English
  • हिन्दी (Hindi)
  • मराठी (Marathi)

आम्हाला फॉलो करा

Email: citynewsmumbai@gmail.com

Phone: 9869128483

© 2026 City News Mumbai. सर्व हक्क राखीव

Designed and Developed byZeloiteZeloite
बंदी झुगारून शिवाजी पार्कवर आंदोलनाचा निर्धार....; ‘जेल भरो’ चा इशारा.....!
  1. मुखपृष्ठ
  2. राष्ट्रीय
राष्ट्रीय

बंदी झुगारून शिवाजी पार्कवर आंदोलनाचा निर्धार....; ‘जेल भरो’ चा इशारा.....!

City News Mumbai•१ ऑक्टोबर, २०२६ रोजी ०५:१७ PM वाजता•72 व्ह्यूज•3 मिनिट वाचा

गांधी जयंतीला "एसआयआर" विरोधात संघर्षाची हाक....; मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याने तणावाची शक्यता..

मुंबई,(अनंत नलावडे )- निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धती विरोधात आणि विशेष मतदार पडताळणी प्रक्रिया अर्थात ‘एसआयआर’ च्या निषेधार्थ गांधी जयंतीच्या दिवशी, २ ऑक्टोबरला मुंबईत आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.मुंबई पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर (शिवाजी पार्क) नियोजित वेळेत आंदोलन करण्याचा निर्धार कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी अडविल्यास ‘जेल भरो’ आंदोलन करण्याचाही इशारा त्यांनी दिला. त्यामुळे गांधी जयंतीच्या दिवशी आंदोलनकर्ते आणि पोलिस प्रशासन यांच्यात संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई प्रेस क्लब येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दीपके यांनी आंदोलनाची भूमिका आणि पुढील कार्यक्रम जाहीर केला. शुक्रवारी, २ ऑक्टोबरला सायंकाळी चार वाजता शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक सहा येथून आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.मुंबईतील आंदोलनानंतर गोवा, बंगळुरू, कोलकाता, पाटणा, उत्तर प्रदेश आणि रांची येथेही आंदोलनाचा विस्तार करण्यात येणार आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याची घोषणाही त्यांनी केली.

या आंदोलनात पक्षाचे झेंडे वापरणार नसून नागरिकांनी राष्ट्रध्वज हातात घेऊन आणि महात्मा गांधींचे छायाचित्र असलेले टी-शर्ट परिधान करून सहभागी व्हावे, असे आवाहन दीपके यांनी केले. आंदोलन अहिंसक मार्गाने करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

परवानगी नाकारल्यावर प्रशासनाला सवाल..

आंदोलनाला परवानगी नाकारल्याबद्दल दीपके यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आंदोलनासाठी ब्रिटिशांची परवानगी घेतली जात नव्हती, असा संदर्भ देत त्यांनी लोकशाहीत नागरिकांना आंदोलनाचा अधिकार असल्याचे सांगितले. राजकीय रॅलींना सायलेन्स झोनमध्ये परवानगी दिली जाते, तर सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी होणाऱ्या आंदोलनाला नकार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“मला तीन महिने तुरुंगात डांबले तरी चालेल. मी पुन्हा जनतेसाठी बाहेर येईन,” असे सांगत त्यांनी अटकेची भीती नसल्याचे स्पष्ट केले.त्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन प्रत्यक्षात कसे होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

मतदार यादीपासून बेरोजगारीपर्यंत मुद्दे....

या आंदोलनाचा केंद्रबिंदू एसआयआर प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाची कार्यपद्धती असली, तरी मतदानाचा अधिकार, बॅलेट पेपरवर निवडणुका, एमपीएससी-यूपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षण आणि बेरोजगारी या मुद्द्यांचाही आंदोलनात समावेश असेल, असे दीपके यांनी सांगितले.राजकीय पक्ष म्हणून काम करण्यापेक्षा प्रभावी सामाजिक दबाव गट उभारण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.
दीपके यांच्या दाव्यानुसार, महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या.....

मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा: ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. त्यांच्या कारभाराची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी आंदोलकांची मागणी आहे.
एसआयआर प्रक्रिया थांबवा: मतदार पडताळणीच्या नावाखाली मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत ही मोहीम तातडीने थांबवावी आणि आगामी निवडणुका २०२५ च्या मूळ मतदार यादीनुसार घ्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
निवड समितीत बदल: निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीत सरन्यायाधीश आणि नागरी समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश कायद्याने अनिवार्य करावा, अशी आंदोलकांची भूमिका आहे.

आता लक्ष पोलिसांच्या भूमिकेकडे.....

गांधी जयंतीच्या दिवशी आंदोलन करण्याचा निर्धार आणि पोलिसांनी नाकारलेली परवानगी यामुळे शिवाजी पार्क परिसरातील परिस्थिती महत्त्वाची ठरणार आहे. आंदोलनकर्ते, पोलिस प्रशासन आणि संभाव्य राजकीय सहभाग यांमुळे या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. प्रत्यक्षात आंदोलन शांततेत पार पडणार की ‘जेल भरो’चा मार्ग स्वीकारला जाणार, हे उद्या शुक्रवारी स्पष्ट होईल.
...
शेअर करा:

More from राष्ट्रीय

महाराष्ट्र सरकारने VIP हवाई प्रवासासाठी सध्याच्या एजन्सींना ६ महिन्यांची मुदतवाढ दिली
राष्ट्रीय

महाराष्ट्र सरकारने VIP हवाई प्रवासासाठी सध्याच्या एजन्सींना ६ महिन्यांची मुदतवाढ दिली

१ ऑक्टो, २०२६
तुकाराम मुंढें यांच्या धडक मोहिमेआड अधिकाऱ्यांकडून मोठी "लूट".....?
राष्ट्रीय

तुकाराम मुंढें यांच्या धडक मोहिमेआड अधिकाऱ्यांकडून मोठी "लूट".....?

२९ सप्टें, २०२६
दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत ‘अनमॅप्ड’ मतदारांकडील कागदपत्रे बीएलओ घरी जाऊन घेणार
राष्ट्रीय

दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत ‘अनमॅप्ड’ मतदारांकडील कागदपत्रे बीएलओ घरी जाऊन घेणार

२७ सप्टें, २०२६
निवडणूक आयोगाची नवीन पहल: पारदर्शकता आणि कार्यक्षमता यांच्याकडे पाऊल
राष्ट्रीय

निवडणूक आयोगाची नवीन पहल: पारदर्शकता आणि कार्यक्षमता यांच्याकडे पाऊल

२५ सप्टें, २०२६
चुनाव आयोग: 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकांची पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्याची भूमिका
राष्ट्रीय

चुनाव आयोग: 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकांची पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्याची भूमिका

२५ सप्टें, २०२६
चुनाव आयोगाचे नवीनतम पाऊल: पारदर्शकता आणि कार्यक्षमतेच्या दिशेने
राष्ट्रीय

चुनाव आयोगाचे नवीनतम पाऊल: पारदर्शकता आणि कार्यक्षमतेच्या दिशेने

२५ सप्टें, २०२६