मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२६
Englishहिन्दीMarathi
City News Mumbai
City News Mumbai
मुख्यपृष्ठई-पेपरव्हिडिओराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञानअपराधइतिहास
टॉपराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञानअपराधइतिहास

सिटी न्यूज मुंबई

मुंबईची प्रत्येक बातमी, सर्वात आधी

श्रेणी

  • स्थानिक
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • व्यवसाय
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • आरोग्य
  • शिक्षण

जलद दुवे

  • मुख्यपृष्ठ
  • ई-पेपर
  • व्हिडिओ
  • आजची छायाचित्र
  • आमच्याबद्दल
  • संपर्क करा
  • गोपनीयता धोरण
  • सेवा अटी

न्यूजरूम

  • संपादकीय धोरण
  • सुधारणा आणि तक्रारी
  • आमच्याशी जाहिरात
  • न्यूजरूम संपर्क

भाषा

  • English
  • हिन्दी (Hindi)
  • मराठी (Marathi)

आम्हाला फॉलो करा

Email: citynewsmumbai@gmail.com

Phone: 9869128483

© 2026 City News Mumbai. सर्व हक्क राखीव

Designed and Developed byZeloiteZeloite
पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतील भत्त्यांमध्ये सुधारणा
  1. मुखपृष्ठ
  2. मुंबई
मुंबई

पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतील भत्त्यांमध्ये सुधारणा

City News Mumbai•६ ऑक्टोबर, २०२६ रोजी ०६:१० PM वाजता•0 व्ह्यूज•2 मिनिट वाचा

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतील भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना त्यांच्या गावाबाहेर राहून उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे याकरिता विभागामार्फत विभागीयस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर आणि ग्रामीण स्तरावर शासकीय वसतिगृहे कार्यान्वित आहेत. विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने त्या प्रमाणात शासकीय वसतिगृहांतील उपलब्ध प्रवेश क्षमता कमी पडू लागल्याने सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेणाऱ्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी "पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना" राबविण्यात येते.
योजनेत इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण किंवा इयत्ता १० वी नंतरच्या दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या व्यावसायिक किंवा तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या परंतु शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह भत्ता यासाठी निश्चित केलेल्या दराने दरवर्षी एकत्रित अशी रक्कम डी.बी.टी.द्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. या योजनेतील भत्त्यांचे दर सन २०१८ मध्ये निर्धारित करण्यात आलेले आहेत. त्यानंतर या भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आलेली नव्हती. आदिवासी विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती विचारात घेता, तसेच महागाई निर्देशांकाचा विचार करता सदर योजनेंतर्गत भत्त्यांच्या रकमेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता भत्त्यांचे सुधारित दर पुढीलप्रमाणे राहतील (कंसात जुने दर) मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्यांकरिता भोजन भत्ता -४२००० (३२०००), निवास भत्ता २८००० (२००००), निर्वाह भत्ता १०००० (८०००). एकूण ८०,०००.(६०,०००).
इतर महसुली विभागीय मुख्यालय, क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता भोजन भत्ता-३७००० (२८०००), निवास भत्ता २१००० (१५०००), निर्वाह भत्ता १०००० (८०००) एकूण ६८०००(५१,०००).
इतर जिल्हा ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांकरिता भोजन भत्ता ३२००० (२५०००), निवास भत्ता १७००० (१२०००), निर्वाह भत्ता ८००० (६०००) एकूण ५७०००. अन्य ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता ३०००० (२३०००), निवास भत्ता १३००० (१००००), निर्वाह भत्ता ७००० (५०००) एकूण – ५००००. या शिवाय वैद्यकीय व अभियांत्रिकीय विद्यार्थ्यांना दरवर्षी ८०००/- रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी रु.४०००/- इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी एकरकमी देण्यात येणार आहे.
००००
शेअर करा:

More from मुंबई

जिल्हा योजनेच्या निधीलाही दुष्काळी "दिशा".........! 30 नोव्हेंबरपर्यंत प्रशासकीय मंजुरीची मुदतवाढ....; जलसंधारण, शेती, आरोग्य-शिक्षणाच्या कामांना प्राधान्य.....
मुंबई

जिल्हा योजनेच्या निधीलाही दुष्काळी "दिशा".........! 30 नोव्हेंबरपर्यंत प्रशासकीय मंजुरीची मुदतवाढ....; जलसंधारण, शेती, आरोग्य-शिक्षणाच्या कामांना प्राधान्य.....

६ ऑक्टो, २०२६
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्व-परिवर्तनावर विशेष मार्गदर्शन शिविर
मुंबई

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्व-परिवर्तनावर विशेष मार्गदर्शन शिविर

४ ऑक्टो, २०२६
 सीजेपीने आंबेडकरी जनतेची आणि महाराष्ट्राची माफी मागावी
मुंबई

सीजेपीने आंबेडकरी जनतेची आणि महाराष्ट्राची माफी मागावी

४ ऑक्टो, २०२६
सुखाग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या नावाखाली अवैध निधी वसुलीवर कारवाईचे निर्देश
मुंबई

सुखाग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या नावाखाली अवैध निधी वसुलीवर कारवाईचे निर्देश

३ ऑक्टो, २०२६
.... हा तर आंदोलनाच्या आड राजकीय अजेंडा.....?
मुंबई

.... हा तर आंदोलनाच्या आड राजकीय अजेंडा.....?

३ ऑक्टो, २०२६
मीरा भायंदर यांनी वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या कचरा गाड्या डिपोमध्ये धूळ फेकत होत्या, करोडोंच्या खर्चावर प्रश्न उभे राहिले.
मुंबई

मीरा भायंदर यांनी वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या कचरा गाड्या डिपोमध्ये धूळ फेकत होत्या, करोडोंच्या खर्चावर प्रश्न उभे राहिले.

१ ऑक्टो, २०२६