गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६
Englishहिन्दीMarathi
City News Mumbai
City News Mumbai
मुख्यपृष्ठई-पेपरव्हिडिओराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञानअपराधइतिहास
टॉपराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञानअपराधइतिहास

सिटी न्यूज मुंबई

मुंबईची प्रत्येक बातमी, सर्वात आधी

श्रेणी

  • स्थानिक
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • व्यवसाय
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • आरोग्य
  • शिक्षण

जलद दुवे

  • मुख्यपृष्ठ
  • ई-पेपर
  • व्हिडिओ
  • आजची छायाचित्र
  • आमच्याबद्दल
  • संपर्क करा
  • गोपनीयता धोरण
  • सेवा अटी

न्यूजरूम

  • संपादकीय धोरण
  • सुधारणा आणि तक्रारी
  • आमच्याशी जाहिरात
  • न्यूजरूम संपर्क

भाषा

  • English
  • हिन्दी (Hindi)
  • मराठी (Marathi)

आम्हाला फॉलो करा

Email: citynewsmumbai@gmail.com

Phone: 9869128483

© 2026 City News Mumbai. सर्व हक्क राखीव

Designed and Developed byZeloiteZeloite
.... हा तर आंदोलनाच्या आड राजकीय अजेंडा.....?
  1. मुखपृष्ठ
  2. मुंबई
मुंबई

.... हा तर आंदोलनाच्या आड राजकीय अजेंडा.....?

City News Mumbai•३ ऑक्टोबर, २०२६ रोजी ०५:२३ AM वाजता•4 व्ह्यूज•3 मिनिट वाचा

दिपकेंना बावनकुळेंचे थेट आव्हान....;"पुरावे द्या, सरकार कारवाई करेल"......!


विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून संघर्षाला राजकीय वळण; आंदोलनाचा अधिकार मान्य, पण दिशाभुलीच्या आरोपांवर महसूलमंत्र्यांचा रोखठोक इशारा....

मुंबई, दि.2(अनंत नलावडे )- 'कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांच्या शुक्रवारी मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर केलेल्या आंदोलनावरून राज्यातील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.आंदोलनाचा अधिकार मान्य करतानाच विद्यार्थ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांचा वापर राजकीय अजेंड्यासाठी होत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मांडली. धमकी, गैरप्रकार किंवा अन्यायाचे आरोप असतील, तर ठोस पुरावे समोर आणा; सरकार संबंधितांवर कारवाई करेल, असे थेट आव्हानच त्यांनी यावेळी दिले.

आता बावनकुळे यांच्या या भूमिकेमुळे आंदोलनातील आरोपांची सत्यता, आंदोलनावरील पोलिसांची कारवाई आणि त्यामागील राजकीय संघर्ष हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.मात्र,आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा मुद्दा हा बावनकुळे यांनी उपस्थित केलेला आरोप आहे; त्याच्या पुष्टीसाठी ठोस पुरावे समोर येणे आवश्यक आहे.

आंदोलनाला विरोध नाही; पण आरोपांची जबाबदारीही घ्या......!

लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा आणि सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे, हे बावनकुळे यांनी मान्य केले. मात्र, विद्यार्थी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांच्या आधारे संभ्रम निर्माण केला जात असेल, तर अशा भूमिकेवर आक्षेप असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.त्यांच्या विधानाचा रोख केवळ आंदोलन करण्याच्या अधिकारावर नसून, आंदोलनातून केले जाणारे आरोप आणि त्यामागील दाव्यांच्या विश्वासार्हतेवर आहे.त्यामुळे आता दिपके यांच्या आंदोलनातील नेमक्या मागण्या कोणत्या, त्यासंदर्भात कोणते पुरावे आहेत आणि सरकारकडून त्यावर काय उत्तर दिले जाते, याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

"धमकी दिली असेल, तर नावे सांगा".....!

दिपके यांच्या आरोपांना उत्तर देताना बावनकुळे यांनी पुराव्यांचाही मुद्दा पुढे केला. कोणाला धमकी देण्यात आली असेल किंवा कोणताही गैरप्रकार घडला असेल, तर संबंधितांची नावे आणि ठोस पुरावे सादर करावेत.सरकार त्याची दखल घेऊन कारवाई करेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.त्यामुळे आता या भूमिकेमुळे वादाला आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे नेऊन तथ्यांच्या आधारे उत्तर देण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.मात्र, जरी आरोप सिद्ध झाले आहेत किंवा ते खोटे आहेत, असा निष्कर्ष पुराव्यांची पडताळणी होण्यापूर्वी काढता येणार नाही.कारण संबंधित तक्रारींची चौकशी आणि त्यातून समोर येणारे निष्कर्ष निर्णायक ठरतील.

पोलिसांची भूमिका चर्चेत; कायद्याची कसोटी महत्त्वाची......

आंदोलनांदरम्यान कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असल्याचे सांगत बावनकुळे यांनी प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचेही समर्थन केले.आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांना खबरदारी घ्यावी लागते, अशी त्यांची भूमिका आहे.मात्र, कायदा-सुव्यवस्था राखण्याची गरज आणि शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आंदोलनावर घातलेले निर्बंध, पोलिसांचे आदेश आणि प्रत्यक्ष कारवाई यांचे मूल्यमापन संबंधित कायदेशीर तरतुदी व उपलब्ध तपशिलांच्या आधारेच करावे लागेल.

राजकीय संघर्षाची पुढची कसोटी.....

बावनकुळे यांच्या विधानाने दिपके यांच्या आंदोलनाला सत्ताधारी भाजपकडून थेट प्रत्युत्तर मिळाले आहे.त्यामुळे आता या संघर्षात केवळ राजकीय आरोपांची देवाणघेवाण होते की आंदोलनातील मुद्द्यांवर ठोस चर्चा होते, हा कळीचा प्रश्न आहे.त्यामुळे आता दिपके यांच्याकडून आरोपांच्या समर्थनार्थ कोणते पुरावे समोर येतात, सरकार त्यावर चौकशी किंवा कारवाई करते का आणि पोलिसांच्या भूमिकेबाबत कायदेशीर आक्षेप उपस्थित होतात का, यावर पुढील घडामोडींची दिशा ठरेल.त्यासाठीच आंदोलनाचा अधिकार आणि सरकारला जाब विचारण्याची मुभा कायम ठेवतानाच, आरोपांची सत्यता पुराव्यांवर तपासली जाणे हीच या संघर्षाची खरी कसोटी ठरणार आहे.
..........................(समाप्त).................
शेअर करा:

More from मुंबई

मादक पदार्थांच्या गुन्ह्यांची आता “फास्ट ट्रॅक” सुनावणी होईल!
मुंबई

मादक पदार्थांच्या गुन्ह्यांची आता “फास्ट ट्रॅक” सुनावणी होईल!

७ ऑक्टो, २०२६
सेवा संकल्प अभियानाच्या अंतर्गत ‘विकसित भारत संकल्प सभा’ आणि ‘सेवा ज्योति यात्रा’ चे आयोजन
मुंबई

सेवा संकल्प अभियानाच्या अंतर्गत ‘विकसित भारत संकल्प सभा’ आणि ‘सेवा ज्योति यात्रा’ चे आयोजन

७ ऑक्टो, २०२६
पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतील भत्त्यांमध्ये सुधारणा
मुंबई

पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतील भत्त्यांमध्ये सुधारणा

६ ऑक्टो, २०२६
जिल्हा योजनेच्या निधीलाही दुष्काळी "दिशा".........! 30 नोव्हेंबरपर्यंत प्रशासकीय मंजुरीची मुदतवाढ....; जलसंधारण, शेती, आरोग्य-शिक्षणाच्या कामांना प्राधान्य.....
मुंबई

जिल्हा योजनेच्या निधीलाही दुष्काळी "दिशा".........! 30 नोव्हेंबरपर्यंत प्रशासकीय मंजुरीची मुदतवाढ....; जलसंधारण, शेती, आरोग्य-शिक्षणाच्या कामांना प्राधान्य.....

६ ऑक्टो, २०२६
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्व-परिवर्तनावर विशेष मार्गदर्शन शिविर
मुंबई

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्व-परिवर्तनावर विशेष मार्गदर्शन शिविर

४ ऑक्टो, २०२६
 सीजेपीने आंबेडकरी जनतेची आणि महाराष्ट्राची माफी मागावी
मुंबई

सीजेपीने आंबेडकरी जनतेची आणि महाराष्ट्राची माफी मागावी

४ ऑक्टो, २०२६