सोमवार, 5 अक्टूबर 2026
Englishहिन्दीMarathi
सिटी न्यूज़ मुंबई
सिटी न्यूज़ मुंबई
होमई-पेपरवीडियोराष्ट्रीयमुंबईराजनीतिखेलस्वास्थ्यप्रौद्योगिकीअपराधइतिहास
टॉपराष्ट्रीयमुंबईराजनीतिखेलस्वास्थ्यप्रौद्योगिकीअपराधइतिहास

सिटी न्यूज़ मुंबई

मुंबई की हर खबर, सबसे पहले

श्रेणियाँ

  • स्थानीय
  • राष्ट्रीय
  • राजनीति
  • व्यापार
  • प्रौद्योगिकी
  • खेल
  • स्वास्थ्य
  • शिक्षा

त्वरित लिंक

  • होम
  • ई-पेपर
  • वीडियो
  • आज की तस्वीर
  • हमारे बारे में
  • संपर्क करें
  • गोपनीयता नीति
  • नियम और शर्तें

न्यूजरूम

  • संपादकीय नीति
  • सुधार और शिकायतें
  • विज्ञापन
  • न्यूजरूम संपर्क

भाषाएँ

  • English
  • हिन्दी (Hindi)
  • मराठी (Marathi)

हमें फॉलो करें

Email: citynewsmumbai@gmail.com

Phone: 9869128483

© 2026 City News Mumbai. सर्वाधिकार सुरक्षित

Designed and Developed byZeloiteZeloite
अब 'AI' गॉगल्स पर महाराष्ट्र की कड़ी निगरानी...; संवेदनशील स्थानों में उपयोग हेतु अब SOP...
  1. होम
  2. मुंबई
मुंबई

अब 'AI' गॉगल्स पर महाराष्ट्र की कड़ी निगरानी...; संवेदनशील स्थानों में उपयोग हेतु अब SOP...

City News Mumbai•20 अगस्त 2026 को 02:41 pm बजे•10 व्यूज़•2 मिनट पढ़ें

स्मार्ट चश्मे में कैमरा, लाइव स्ट्रीमिंग, फेस रिकग्निशन और डेटा संग्रह पर भी सरकार की निगरानी…; मंत्रालय से लेकर सीधे हवाई अड्डों तक उपयोग के नियम तय होंगे…

मुंबई, दि.२०(अनंत नलावडे)- राज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित स्मार्ट गॉगल्स, स्मार्ट ग्लासेस आणि कॅमेरायुक्त चष्म्यांच्या वाढत्या वापरातून राष्ट्रीय व राज्य सुरक्षेला तसेच नागरिकांच्या गोपनीयतेला संभाव्य धोका निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने आता या अत्याधुनिक उपकरणांच्या वापरासाठी स्वतंत्र मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यातही विशेष म्हणजे, अशा उपकरणांमधून होणारे फोटो-व्हिडिओ चित्रीकरण, ध्वनिमुद्रण, थेट प्रसारण (Live Streaming), चेहरा ओळख (Facial Recognition) आणि डेटा संकलन यांचा सखोल अभ्यास करून त्याच्या सुरक्षित वापरासाठी नियमही निश्चित केले जाणार आहेत.

याबाबत गृह विभागाने गुरुवारी शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-०७२६/प्र.क्र.३१४/विशा-३(अ) जारी केला असून, हा शासन निर्णय २० ऑगस्ट २०२६ रोजी मंत्रालय, मुंबई येथून निर्गमित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर या आदेशाचा संकेतांक २०२६०८२०१७३३५४७३२९ असा आहे.

S4C प्रमुखांकडे एक सदस्यीय समिती.....

या SOPच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र राज्य सायबर गुन्हे समन्वय केंद्र (S4C)चे प्रमुख तथा अपर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य सायबर, मुंबई यांची एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. समितीला शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून चार महिन्यांच्या आत गृह विभागाला सविस्तर अहवाल आणि शिफारसी सादर कराव्या लागणार आहेत.

मंत्रालयापासून विमानतळांपर्यंत सुरक्षा कवच......

समितीला केवळ तांत्रिक अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता स्मार्ट गॉगल्स आणि अन्य AI आधारित परिधान करण्यायोग्य उपकरणांमुळे निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्या संभाव्य धोक्यांचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रालय, शासकीय कार्यालये, पोलीस ठाणे, न्यायालय परिसर, विमानतळे, रेल्वे स्थानके, ऊर्जा प्रकल्प, बंदरे, संरक्षणाशी संबंधित संवेदनशील ठिकाणे यांसह शैक्षणिक संस्था, रुग्णालये, धार्मिक आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी अशा उपकरणांच्या वापराचा परिणाम तपासला जाणार आहे.

"स्मार्ट" उपकरणांसाठी काय चालेल, काय नाही.....?

AI गॉगल्सचा वापर कुठे करावा, कुठे करू नये, कोणत्या परिस्थितीत चित्रीकरण किंवा ध्वनिमुद्रणावर निर्बंध असावेत, लाईव्ह स्ट्रीमिंगला कोणत्या मर्यादा असाव्यात तसेच नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचे संरक्षण कसे करावे, याबाबत स्पष्ट सुरक्षा प्रोटोकॉल तयार करण्याचे निर्देश समितीला देण्यात आले आहेत. इतकेच नव्हे, तर अशा उपकरणांचा गैरवापर किंवा संभाव्य धोका ओळखण्यासाठी सुरक्षा अधिकारी आणि संबंधित यंत्रणांसाठी विशेष प्रशिक्षण मॉड्यूल तयार करण्याची शिफारसही समिती करणार आहे.

"स्मार्ट गॉगल्स" च्या युगात सुरक्षेचा नवा पेच......

मोबाईल कॅमेऱ्यापेक्षा अधिक सहज आणि नजरेआड पद्धतीने चित्रीकरण करता येणाऱ्या स्मार्ट गॉगल्समुळे संवेदनशील ठिकाणांची दृश्ये, संभाषणे किंवा अन्य माहिती अनवधानाने अथवा जाणीवपूर्वक नोंदवली जाऊ शकते. AIच्या मदतीने चेहरा ओळख आणि माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता वाढत असल्याने तंत्रज्ञानाचा वेग आणि सुरक्षा यंत्रणे…
साझा करें:

More from मुंबई

सहकारी गृहनिर्माण संस्थाओं के स्व-पुनर्विकास पर विशेष मार्गदर्शन शिविर
मुंबई

सहकारी गृहनिर्माण संस्थाओं के स्व-पुनर्विकास पर विशेष मार्गदर्शन शिविर

4 अक्टू॰ 2026
सीजेपी को आंबेडकरी जनता और महाराष्ट्र से माफी माँगनी चाहिए.
मुंबई

सीजेपी को आंबेडकरी जनता और महाराष्ट्र से माफी माँगनी चाहिए.

4 अक्टू॰ 2026
सुखाग्रस्त किसानों की मदद के नाम पर अवैध निधि वसूली पर कार्रवाई के निर्देश
मुंबई

सुखाग्रस्त किसानों की मदद के नाम पर अवैध निधि वसूली पर कार्रवाई के निर्देश

3 अक्टू॰ 2026
.... यह तो आंदोलन के पीछे राजनीतिक एजेंडा है.....?
मुंबई

.... यह तो आंदोलन के पीछे राजनीतिक एजेंडा है.....?

3 अक्टू॰ 2026
मीरा भायंदर वर्षों पहले खरीदी गईं कचरा गाड़ियां डिपो में धूल फांक रहीं, करोड़ों के खर्च पर उठे सवाल
मुंबई

मीरा भायंदर वर्षों पहले खरीदी गईं कचरा गाड़ियां डिपो में धूल फांक रहीं, करोड़ों के खर्च पर उठे सवाल

1 अक्टू॰ 2026
मीरा भाईंदर केवल जैन नगरी है? भाजपा विधायक नरेंद्र मेहता के बयान पर तीखा विवाद, शिवसेना समर्थकों ने माफी की मांग
मुंबई

मीरा भाईंदर केवल जैन नगरी है? भाजपा विधायक नरेंद्र मेहता के बयान पर तीखा विवाद, शिवसेना समर्थकों ने माफी की मांग

1 अक्टू॰ 2026