सोमवार, २१ सप्टेंबर, २०२६
Englishहिन्दीMarathi
City News Mumbai
City News Mumbai
मुख्यपृष्ठई-पेपरव्हिडिओराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान
टॉपराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान

सिटी न्यूज मुंबई

मुंबईची प्रत्येक बातमी, सर्वात आधी

श्रेणी

  • स्थानिक
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • व्यवसाय
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • आरोग्य
  • शिक्षण

जलद दुवे

  • मुख्यपृष्ठ
  • ई-पेपर
  • व्हिडिओ
  • आजची छायाचित्र
  • आमच्याबद्दल
  • संपर्क करा
  • गोपनीयता धोरण
  • सेवा अटी

न्यूजरूम

  • संपादकीय धोरण
  • सुधारणा आणि तक्रारी
  • आमच्याशी जाहिरात
  • न्यूजरूम संपर्क

भाषा

  • English
  • हिन्दी (Hindi)
  • मराठी (Marathi)

आम्हाला फॉलो करा

Email: citynewsmumbai@gmail.com

Phone: 9869128483

© 2026 City News Mumbai. सर्व हक्क राखीव

Designed and Developed byZeloiteZeloite
शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; राज्याचे सुलतान देवेंद्र फडणवीसांनी हेक्टरी १ लाख रुपये मदत व सरसकट कर्जमाफी द्यावी: हर्षवर्धन सकपाळ
शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; राज्याचे सुलतान देवेंद्र फडणवीसांनी हेक्टरी १ लाख रुपये मदत व सरसकट कर्जमाफी द्यावी: हर्षवर्धन सकपाळ — photo 2
1/2
  1. मुखपृष्ठ
  2. राजकारण
राजकारण

शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; राज्याचे सुलतान देवेंद्र फडणवीसांनी हेक्टरी १ लाख रुपये मदत व सरसकट कर्जमाफी द्यावी: हर्षवर्धन सकपाळ

City News Mumbai•२१ सप्टेंबर, २०२६ रोजी ०४:२३ AM वाजता•0 व्ह्यूज•2 मिनिट वाचा

*शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत ही सबब नको; गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाचा ७८ हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांसाठी वापरा.*

*दुष्काळ राजकारणाचा विषय नाही पण सरकारला जाग कधी येणार? संकटातील बळीराजाला मदत देण्यासाठी मुहूर्त कशाला?*

*कृषीमंत्र्यांच्या शेतातील भेटी हा केवळ देखावा; बुलढाणा जिल्ह्यातील दौऱ्यावेळी कृषीमंत्र्यांचा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध.*

मुंबई/बुलढाणा दि. २० सप्टेंबर २६

मागील ४०-४५ दिवसापासून पावसाने खंड दिला असून पीकं करपून गेली आहेत. दुष्काळ पडलेला असताना सरकार मात्र बैठका व चर्चा यात वेळ मारून नेत आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पहात आहे, असा संतप्त प्रश्न विचारून अस्मानी व सुलतानी संकटात असलेल्या बळीराजाला राज्याचे सुलतान देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, हेक्टरी १ लाख रुपये मदत व सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, शेतीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे, शेतकरी संकटात आहे, बुलढाणा जिल्ह्यातील एका तरूण शेतकऱ्याने त्याचे २० एकर सोयाबीन मोडीत काढण्याचा निर्णय घेतला. या शेतकऱ्याने मुख्यमंत्री व मंत्र्यांनाही आपल्या शेताची अवस्था पाहण्यास या, अशी आर्त विनंती केली होती पण कोणीही या शेतकऱ्याकडे फिरकले नाही. कृषीमंत्री बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते पण तेही फिरकले नाहीत. महायुती सरकार हे आंघळं, बहिरं व मुकं सरकार आहे. शेतकरी सरकारकडे मायबाप म्हणून आशेने पहात असते पण या सरकारला त्यांचे काहीही पडलेले नाही. या शेतकऱ्याचे सांत्वन करणे हे माझे कर्तव्य आहे म्हणून मी या शेतकऱ्याची भेट घेतली. दुष्काळ हा राजकारण करण्याचा विषय नाही याचे भान आम्हाला आहे, पण सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे पण तसे होताना दिसत नाही.

राज्यातील शेतकऱ्याची अवस्था अत्यंत बिकट आहे त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर बोलावलेल्या बैठकीत काजू बदामवर सत्ताधारी पक्षाचे खासदार ताव मारत आहेत, सरकारकडे संवेदनाच नाहीत. बळीराजाला तात्काळ मदत मिळावी यासाठी काँग्रेस पक्ष सत्याग्रह करत आहे, काँग्रेसचे कार्यकर्ते गावोगावी आंदोलन करत आहेत, सरकारने तातडीने मदत जाहीर केली नाही तर मंत्री व सत्ताधारी पक्षाच्या आमदार खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, याचा पुनरुच्चार सपकाळ यांनी केला.

महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी आहे, बुलढाणा जिल्ह्यातील या गावात कर्जमाफीच्या पहिल्या यादीत दोन शेतकऱ्याची नावे होती तर दुसऱ्या यादीत एका शेतकऱ्याचे नाव आहे, या शेतकऱ्याला फक्त ४० हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. सरकारचे दावे व वस्तुस्थिती यात मोठा फरक आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखाची आहे पण शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये, आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
शेअर करा:

More from राजकारण

वाटदच्या प्रस्तावित डिफेन्स क्लस्टरबाबत आठवडाभरात निर्णय; ग्रामस्थांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
राजकारण

वाटदच्या प्रस्तावित डिफेन्स क्लस्टरबाबत आठवडाभरात निर्णय; ग्रामस्थांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

२१ सप्टें, २०२६
छत्रीची गूंज: भारताच्या ग्रामीण भागात सामाजिक सुरक्षा याची नवीन पहल
राजकारण

छत्रीची गूंज: भारताच्या ग्रामीण भागात सामाजिक सुरक्षा याची नवीन पहल

२० सप्टें, २०२६
मराठवाड्याचा दुष्काळ होणार आता इतिहासजमा.......? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्रांतिकारी घोषणा........!
राजकारण

मराठवाड्याचा दुष्काळ होणार आता इतिहासजमा.......? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्रांतिकारी घोषणा........!

१८ सप्टें, २०२६
मीरा भाईंदरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनावर भाजप जिल्हा कार्यालयात रुद्राभिषेक
राजकारण

मीरा भाईंदरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनावर भाजप जिल्हा कार्यालयात रुद्राभिषेक

१७ सप्टें, २०२६
नरेंद्र मेहता यांच्या जाहीरनंतर काँग्रेसचा प्रत्युत्तर, “प्रत्येक जमीन वादात 7/11 आणि नरेंद्र मेहता यांचे नाव का?” — राकेश पुरोहित
राजकारण

नरेंद्र मेहता यांच्या जाहीरनंतर काँग्रेसचा प्रत्युत्तर, “प्रत्येक जमीन वादात 7/11 आणि नरेंद्र मेहता यांचे नाव का?” — राकेश पुरोहित

१६ सप्टें, २०२६
मनोज जरांगेंच्या भाषेवर मंत्रिमंडळात संताप........?
राजकारण

मनोज जरांगेंच्या भाषेवर मंत्रिमंडळात संताप........?

१६ सप्टें, २०२६