बुधवार, १६ सप्टेंबर, २०२६
Englishहिन्दीMarathi
City News Mumbai
City News Mumbai
मुख्यपृष्ठई-पेपरव्हिडिओराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान
टॉपराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान

सिटी न्यूज मुंबई

मुंबईची प्रत्येक बातमी, सर्वात आधी

श्रेणी

  • स्थानिक
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • व्यवसाय
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • आरोग्य
  • शिक्षण

जलद दुवे

  • मुख्यपृष्ठ
  • ई-पेपर
  • व्हिडिओ
  • आजची छायाचित्र
  • आमच्याबद्दल
  • संपर्क करा
  • गोपनीयता धोरण
  • सेवा अटी

न्यूजरूम

  • संपादकीय धोरण
  • सुधारणा आणि तक्रारी
  • आमच्याशी जाहिरात
  • न्यूजरूम संपर्क

भाषा

  • English
  • हिन्दी (Hindi)
  • मराठी (Marathi)

आम्हाला फॉलो करा

Email: citynewsmumbai@gmail.com

Phone: 9869128483

© 2026 City News Mumbai. सर्व हक्क राखीव

Designed and Developed byZeloiteZeloite
दिघीत २७ हजार कोटींचा "मेगा" जहाजबांधणी प्रकल्प.......!
  1. मुखपृष्ठ
  2. राष्ट्रीय
राष्ट्रीय

दिघीत २७ हजार कोटींचा "मेगा" जहाजबांधणी प्रकल्प.......!

City News Mumbai•१६ सप्टेंबर, २०२६ रोजी ०३:५१ AM वाजता•0 व्ह्यूज•3 मिनिट वाचा

महाराष्ट्राच्या सागरी औद्योगिक सामर्थ्याला नवी झेप...... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एमडीएल- एनशिपएमएल चा करार......;

मोठ्या व्यावसायिक जहाजांच्या निर्मितीचाही मार्ग मोकळा.......!

मुंबई, दि.१५(अनंत नलावडे )- महाराष्ट्राच्या सागरी औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रायगडच्या दिघी येथे आकाराला येणार आहे. प्रस्तावित "ग्रीनफिल्ड" जहाजबांधणी औद्योगिक समूहात प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड (एनशिपएमएल) आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी एक महत्वाकांशी सामंजस्य करार झाला. या प्रकल्पासाठी एमडीएलकडून सुमारे २७ हजार कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक होणार असून, राज्यात तब्बल ९० हजार रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

दिघी येथे एमडीएलकडून दरवर्षी किमान २ दशलक्ष सकल टनभार (ग्रॉस टनेज) जहाजबांधणी क्षमता उभारण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील पारंपरिक जहाजबांधणी क्षमतेला रायगडच्या दिघीमध्ये मोठ्या औद्योगिक विस्ताराची जोड मिळणार असून, मोठ्या व्यावसायिक जहाजांच्या निर्मितीसाठी आधुनिक पायाभूत सुविधाही उभ्या राहणार आहेत.

महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरण यांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या एनशिपएमएलच्या माध्यमातून हा ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकसित केला जात असून केंद्राच्या ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकास आराखड्याशी जोडलेला हा प्रकल्प "मेरीटाईम अमृत काल व्हिजन २०४७" च्या उद्दिष्टांनाही पूरक ठरणार आहे.
या प्रकल्पाचा परिणाम केवळ जहाजबांधणी पुरता मर्यादित राहणार नसून त्याभोवती अभियांत्रिकी, उपकरणनिर्मिती, कच्चा माल, लॉजिस्टिक्स, पुरवठादार आणि सेवा उद्योगांची मोठी परिसंस्था उभी राहण्याची अपेक्षा आहे. परिणामी रायगडमध्ये रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याबरोबरच महाराष्ट्राची देशातील आणि जागतिक सागरी उद्योगातील स्पर्धात्मकता वाढविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, असा ठाम विश्वास खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.

यामागे प्रामुख्याने, जहाज बांधणी व्यवसायातील अनुभवी व नामांकित
एमडीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन यांनी जटिल जहाजबांधणी, अभियांत्रिकी, प्रकल्प व्यवस्थापन आणि देशांतर्गत पुरवठादार व्यवस्था विकसित करण्याचा एमडीएलचा अनुभव दिघी प्रकल्पासाठी उपयोगी ठरेल, असे स्पष्ट केले. सर्व संबंधित घटकांच्या सहकार्याने जागतिक स्तरावरील आधुनिक व स्पर्धात्मक जहाजबांधणी सुविधा उभारण्याचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

करारावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, बंदरे व परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, बिझनेस डेव्हलपमेंटचे सरव्यवस्थापक संजयकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते. एमडीएलतर्फे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन आणि एनशिपएमएलतर्फे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पी.यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

राजकीय व औद्योगिक अर्थ :

मुंबईबाहेर महाराष्ट्राच्या सागरी अर्थव्यवस्थेचा पहिल्यांदाच विस्तार......!

दिघीचा हा प्रकल्प केवळ २७ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा विषय नाही.तर मुंबई–नवी मुंबई–रायगड या सागरी पट्ट्यात मोठ्या उद्योगांचे नवे केंद्र विकसित करण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी मोठी गुंतवणूक, रोजगार आणि बंदराधारित उद्योग हे तीन मुद्दे एकत्र आणणारा हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र या प्रस्तावित गुंतवणुकीचे प्रत्यक्ष रूपांतर, वेळेत पायाभूत सुविधा आणि रोजगारनिर्मितीची उद्दिष्टे कितपत साध्य होतात, यावर या कराराचे खरे यश अवलंबून राहणार आहे.
........................(समाप्त).................




शेअर करा:

More from राष्ट्रीय

भारत सरकारने 2025 मध्ये एकत्रित व्यावसायिक कोड (UCC) लागू करण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रीय

भारत सरकारने 2025 मध्ये एकत्रित व्यावसायिक कोड (UCC) लागू करण्याचा निर्णय घेतला.

१६ सप्टें, २०२६
"अस्सलामु अलैकुम" अभिवादन; IPS अधिकारीविरुद्ध तक्रार
राष्ट्रीय

"अस्सलामु अलैकुम" अभिवादन; IPS अधिकारीविरुद्ध तक्रार

१५ सप्टें, २०२६
अमित शाह यांनी यूसीसीच्या विधानावर विस्तृत स्पष्टीकरण दिले
राष्ट्रीय

अमित शाह यांनी यूसीसीच्या विधानावर विस्तृत स्पष्टीकरण दिले

१४ सप्टें, २०२६
केंद्रीय सरकारची नवीन आर्थिक पहल: 2024 बजेटमध्ये प्रमुख बदल
राष्ट्रीय

केंद्रीय सरकारची नवीन आर्थिक पहल: 2024 बजेटमध्ये प्रमुख बदल

१२ सप्टें, २०२६
हा तर अन्नाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ........? तीन महिन्यांत FDA चा  "धडाका".......!
राष्ट्रीय

हा तर अन्नाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ........? तीन महिन्यांत FDA चा "धडाका".......!

१२ सप्टें, २०२६
केंद्रीय सरकारची नवीन आर्थिक धोरण: प्रमुख उपक्रम आणि संभाव्य प्रभाव
राष्ट्रीय

केंद्रीय सरकारची नवीन आर्थिक धोरण: प्रमुख उपक्रम आणि संभाव्य प्रभाव

१२ सप्टें, २०२६