सोमवार, १४ सप्टेंबर, २०२६
Englishहिन्दीMarathi
City News Mumbai
City News Mumbai
मुख्यपृष्ठई-पेपरव्हिडिओराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान
टॉपराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान

सिटी न्यूज मुंबई

मुंबईची प्रत्येक बातमी, सर्वात आधी

श्रेणी

  • स्थानिक
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • व्यवसाय
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • आरोग्य
  • शिक्षण

जलद दुवे

  • मुख्यपृष्ठ
  • ई-पेपर
  • व्हिडिओ
  • आजची छायाचित्र
  • आमच्याबद्दल
  • संपर्क करा
  • गोपनीयता धोरण
  • सेवा अटी

न्यूजरूम

  • संपादकीय धोरण
  • सुधारणा आणि तक्रारी
  • आमच्याशी जाहिरात
  • न्यूजरूम संपर्क

भाषा

  • English
  • हिन्दी (Hindi)
  • मराठी (Marathi)

आम्हाला फॉलो करा

Email: citynewsmumbai@gmail.com

Phone: 9869128483

© 2026 City News Mumbai. सर्व हक्क राखीव

Designed and Developed byZeloiteZeloite
भारतीय ज्ञानपरंपरेच्या जतन, संवर्धनासाठी एशियाटिक सोसायटीने पुढाकार घ्यावा
  1. मुखपृष्ठ
  2. महाराष्ट्र
महाराष्ट्र

भारतीय ज्ञानपरंपरेच्या जतन, संवर्धनासाठी एशियाटिक सोसायटीने पुढाकार घ्यावा

City News Mumbai•१४ सप्टेंबर, २०२६ रोजी ०४:२६ AM वाजता•0 व्ह्यूज•4 मिनिट वाचा

*-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह*

*एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने ज्ञानाचे डिजिटायझेशन करून देशभरातील ग्रंथालये व संशोधन संस्थांशी जोडावे*

मुंबई, : भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने पुढाकार घ्यावा. संस्थेकडील ज्ञानसंग्रहाचे डिजिटायझेशन करून तो देशभरातील विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

टाउन हॉल येथे एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या नवनिर्वाचित समितीच्या परिचय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आमदार अमित साटम, प्रवीण दरेकर, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, सचिव विवेक गणपुले आदी उपस्थित होते. यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक रमेश दंडवते यांनी एशियाटिकच्या बळकटीकरणासाठी 50 लाख रुपयांची मदत केली, याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, राष्ट्राची स्मृती, इतिहास, संस्कार, भाषा, अभिलेख आणि परंपरांचे जतन महत्त्वाचे आहे. इतिहास आणि सांस्कृतिक परंपरांचे संरक्षण करणाऱ्या राष्ट्राची अस्मिता कधीही नष्ट होत नाही. भारतीय ज्ञानपरंपरा अनेक आव्हानांनंतरही टिकून राहिली आहे. ज्ञान कोणत्याही चौकटीत बंदिस्त न राहता मुक्त असले पाहिजे. या ज्ञानाचा उपयोग देशासह संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी व्हावा.
भारतीय इतिहास, पुरातत्त्व, भाषा, तत्त्वज्ञान, साहित्य आणि विज्ञानाचे पुनर्मूल्यांकन भारतीय दृष्टिकोनातून होणे आवश्यक आहे. सोसायटीने महाराष्ट्रातील विद्यार्थी व संशोधकांना संग्रहाच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यावे, ज्ञानसंग्रहाचे डिजिटायझेशन करावे आणि देशातील ग्रंथालये व संशोधन संस्थांना सामायिक व्यासपीठावर जोडावे. तसेच ‘ज्ञान भारत राष्ट्रीय पांडुलिपी मिशन’मध्ये सक्रिय सहभाग घेऊन गावागावांत आणि विद्वानांच्या घरांमध्ये जतन केलेल्या दुर्मीळ पांडुलिपींचा शोध, संकलन, संवर्धन व संशोधनासाठी विशेष अभियान राबवावे, असे आवाहनही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

*एशियाटिक सोसायटीचे कार्य अधिक व्यापक व्हावे*

*-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एशियाटिक सोसायटीच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. इतिहास हा केवळ भूतकाळ समजून घेण्याचे साधन नसून वर्तमानाला दिशा देणारा आणि भविष्याचा वेग निश्चित करणारा महत्त्वपूर्ण दुवा आहे, असे त्यांनी सांगितले. मानवतेचा प्रवास, विचारांची जडणघडण, अभ्यासपद्धती आणि विविध शास्त्रांची उत्क्रांती यांचे दस्तऐवजीकरण होणे अत्यावश्यक आहे. परकीय आक्रमणांमध्ये नालंदा विद्यापीठाच्या मोठ्या प्रमाणावर नष्ट झालेल्या ग्रंथसंपदेच्या घटनांतून ज्ञानसंपदेच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित होते. मात्र अनेक विद्वानांनी उपलब्ध ग्रंथांचे संरक्षण करून ही समृद्ध ज्ञानपरंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवली. या परंपरेचे जतन आणि संवर्धन करणे ही आजची मोठी जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

नव्या कार्यकारिणीच्या प्रयत्नांमुळे संस्थेला नवसंजीवनी मिळाली असून एशियाटिक सोसायटी नव्या उमेदीने कार्यरत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. *राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाची नवीन जागा तयार झाली आहे. ते या नवीन जागेत हलविण्याबाबत निर्णय झालेला आहे. तसेच, ग्रंथालय संचालनालय व सहायक मुद्रांक नियंत्रकांची कार्यालयेही येथून अन्यत्र हलविण्याबाबतही लवकरच शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल.* सोसायटीच्या मुख्य कार्याला अधिक बळ मिळावे, तसेच येथे येणाऱ्या अभ्यासकांना आवश्यक ग्रंथ, संदर्भसाहित्य आणि ज्ञानसंपदा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल. मुख्यमंत्री कार्यालय, संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून आवश्यक मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी एशियाटिक सोसायटीच्या नूतन कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत संस्थेच्या भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

*एशियाटिक सोसायटीचा वारसा जतनासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य*

*-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एशियाटिक सोसायटीचा 222 वर्षांचा गौरवशाली वारसा आहे. प्राचीन ग्रंथ, पांडुलिपी व नाणी यांचे जतन भावी पिढ्यांसाठी आवश्यक असून या वारशाच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारकडून संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमाबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदनही केले.

*'गणेश ज्ञानारती’ प्रदर्शनाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन*

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई येथे ‘गणेश ज्ञानारती’ प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रदर्शनाची पाहणी करून ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेव्यांची माहिती जाणून घेतली. प्रदर्शनात मौर्य, सातवाहन, गुप्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुमारे 1300 दुर्मिळ सुवर्ण, रजत, कांस्य व तांब्याची ऐतिहासिक नाणी येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. भगवान गौतम बुद्धांच्या भिक्षापात्राचा अंश, बुद्ध प्रतिमा व बोधिसत्त्वाचे अवशेषही मांडण्यात आले आहेत. मुघलकालीन हिंदुस्तानाचा 1788 मधील नकाशा आणि नर्मदा नदीचा 1870 मधील नकाशाही प्रदर्शनाचे आकर्षण आहे. भारतीय राजे व जमीनदारांचा शाही दरबार अल्बमसह अनेक दुर्मिळ ऐतिहासिक ग्रंथ येथे ठेवण्यात आले होते. कोल्हापूर व कान्हेरी येथील पुरातत्त्वीय उत्खननातील वस्तू तसेच बुद्ध प्रतिमा यांच्यासह भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्वीय वारशाचे समृद्ध दर्शन घडविणारे असे हे प्रदर्शन होते.

एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. आभार सचिव विनय गणपुले यांनी मानले.
****
शेअर करा:

More from महाराष्ट्र

एमएच-सीईटीशी संबंधित विविध समस्या मांडण्यासाठी राज्यभरातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संपूर्ण तक्रारी ऐकून घेत, पुढील आदेश दिले
महाराष्ट्र

एमएच-सीईटीशी संबंधित विविध समस्या मांडण्यासाठी राज्यभरातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संपूर्ण तक्रारी ऐकून घेत, पुढील आदेश दिले

१४ सप्टें, २०२६
महाराष्ट्र

अमित शाह यांना नवीन राष्ट्रीय ऊर्जा धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती: ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल

१४ सप्टें, २०२६
भिवंडीमध्ये चोरीच्या दोन घटना, SIR च्या स्कॅनरने महिलांच्या सोन्याच्या कड्यांवर हात स्वच्छ असल्याचे दाखवले.
महाराष्ट्र

भिवंडीमध्ये चोरीच्या दोन घटना, SIR च्या स्कॅनरने महिलांच्या सोन्याच्या कड्यांवर हात स्वच्छ असल्याचे दाखवले.

१२ सप्टें, २०२६
भिवंडीतील मिठाईंमुळे चमकदार रंग गायब, तुकाराम मुंढेची कडकपणा दर्शवितो परिणाम
महाराष्ट्र

भिवंडीतील मिठाईंमुळे चमकदार रंग गायब, तुकाराम मुंढेची कडकपणा दर्शवितो परिणाम

१२ सप्टें, २०२६
वीज कंपन्या सरकारीच......; मात्र  महावितरणच्या कर्जमुक्तीला "IPO" चा शॉर्टकट.......!
महाराष्ट्र

वीज कंपन्या सरकारीच......; मात्र महावितरणच्या कर्जमुक्तीला "IPO" चा शॉर्टकट.......!

११ सप्टें, २०२६
ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास गणेश मंडळे आणि डीजे संचालकांवर कठोर कारवाई होईल
महाराष्ट्र

ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास गणेश मंडळे आणि डीजे संचालकांवर कठोर कारवाई होईल

११ सप्टें, २०२६