शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६
Englishहिन्दीMarathi
City News Mumbai
City News Mumbai
मुख्यपृष्ठई-पेपरव्हिडिओराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान
टॉपराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान

सिटी न्यूज मुंबई

मुंबईची प्रत्येक बातमी, सर्वात आधी

श्रेणी

  • स्थानिक
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • व्यवसाय
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • आरोग्य
  • शिक्षण

जलद दुवे

  • मुख्यपृष्ठ
  • ई-पेपर
  • व्हिडिओ
  • आजची छायाचित्र
  • आमच्याबद्दल
  • संपर्क करा
  • गोपनीयता धोरण
  • सेवा अटी

न्यूजरूम

  • संपादकीय धोरण
  • सुधारणा आणि तक्रारी
  • आमच्याशी जाहिरात
  • न्यूजरूम संपर्क

भाषा

  • English
  • हिन्दी (Hindi)
  • मराठी (Marathi)

आम्हाला फॉलो करा

Email: citynewsmumbai@gmail.com

Phone: 9869128483

© 2026 City News Mumbai. सर्व हक्क राखीव

Designed and Developed byZeloiteZeloite
सी लिंक" ला मुदतवाढ.......; जनतेला खर्चाचा भार........? मूळ डेडलाइन २०२४; आता थेट २०२८....!
  1. मुखपृष्ठ
  2. मुंबई
मुंबई

सी लिंक" ला मुदतवाढ.......; जनतेला खर्चाचा भार........? मूळ डेडलाइन २०२४; आता थेट २०२८....!

City News Mumbai•२९ ऑगस्ट, २०२६ रोजी ०४:०४ PM वाजता•7 व्ह्यूज•2 मिनिट वाचा

Mahiti adhikar कार्यकर्ते अनिल गलगलींचा "MSRDC" ला सवाल...; चार वर्षांच्या विलंबाची किंमत कोण भरणार.......?

मुंबई, दि.२९(अनंत नलावडे)- मुंबईच्या वाहतुकीला वेग देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा प्रकल्पाला तब्बल १,४२१ दिवसांची मुदतवाढ मिळते; मात्र कंत्राटदाराच्या विलंबासाठी दंडाची कारवाई झाली का, याचा हिशेब कुठे आहे...? असा थेट सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उपस्थित केला आहे. २४ जून २०१९ रोजी सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मूळ पूर्णता तारीख २१ जून २०२४ होती.पा्रतु चार टप्प्यांत मुदतवाढ देत आता हीच तारीख थेट १७ मे २०२८ वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रकल्पाला मुदतवाढ की कंत्राटदाराला दिलासा,.....? असा राजकीय आणि प्रशासकीय सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

MSRDC कडून RTI मध्ये मिळालेल्या माहितीनुसार, प्रकल्पाला पहिली २५० दिवसांची मुदतवाढ कास्टिंग यार्डसाठी जमीन उपलब्ध न झाल्यामुळे देण्यात आली. त्यानंतर कोविड-१९मुळे कामात झालेल्या व्यत्ययाचा दाखला देत आणखी १८० दिवस वाढवण्यात आले.पुढे EPC कंत्राटदाराच्या JV मधील पुनर्रचनेच्या कारणावरून तब्बल ४८३ दिवस, तर कामाच्या व्याप्तीत बदल आणि अतिरिक्त कामांचा दाखला देत आणखी ५०८ दिवसांची मुदतवाढ मंजूर करण्यात आली.म्हणजेच चार मुदतवाढींची एकूण बेरीज १,४२१ दिवस.....!

‘डेडलाइन’ चार वर्षे पुढे;मीेg जबाबदारी कुणाची.......?

मुदतवाढीची कारणे कागदावर असली तरी प्रत्येक विलंबासाठी नेमकी जबाबदारी कोणाची....? हा मूलभूत प्रश्न अद्याप कायम आहे.विशेषतः Webuild-Apco JV च्या जबाबदारीतील विलंबासाठी करारातील Liquidated Damages ची तरतूद लागू झाली का, लागू झाली असेल तर किती रक्कम वसूल झाली आणि लागू झाली नसेल तर त्यामागचे कारण काय, याची स्पष्ट माहिती सार्वजनिक करण्याची मागणीहाी गलगली यांनी केली आहे.

कारण, सरकारी प्रकल्प उशिरा झाला की डेडलाइन पुढे ढकलणे सोपे; पण त्या विलंबाची आर्थिक किंमत कोणाच्या खिशातून जाणार......? हा प्रश्न सामान्य मुंबईकरांच्या पैशाशी संबंधित आहे.
मुदतवाढीबरोबर खर्चही वाढणार...?
वर्सोवा-बांद्रा सी लिंकचा विलंब केवळ कॅलेंडरवरील तारखेचा विषय नाही. तरं काम लांबले की अतिरिक्त मनुष्यबळ, यंत्रसामग्री, कंत्राटी दायित्वे, देखभाल आणि बदललेल्या कामाच्या व्याप्तीचा खर्च वाढण्याची शक्यता असते.त्यामुळे १,४२१ दिवसांच्या विलंबाचा सार्वजनिक तिजोरीवर नेमका आर्थिक परिणाम किती झाला किंवा होणार आहे, याचाही स्वतंत्र हिशेब आवश्यक आहे, असे
गलगली यांचे mhanane aahe. tyamule प्रत्येक मुदतवाढी मागील कारण, विलंबासाठी जबाबदार पक्ष, अतिरिक्त आर्थिक भार आणि कंत्राटातील दंडात्मक तरतुदींची अंमलबजावणी याबाबत MSRDCने संपूर्ण माहिती जनतेसमोर जाहीर करावी, अशीही मागणी गलगली केली आहे.

"सी लिंक" चा विलंब; ‘दंड’ मात्र वेटिंगवर....?

मुंबईकरांच्या कराच्या पैशातून उभ्या राहणाऱ्या प्रकल्पाला १,४२१ दिवसांची मुदतवाढ मिळते, मूळ डेडलाइन २०२४ वरून २०२८ वर जाते; पण कंत्राटदारावर दंडाची तलवार चालली का, हा प्रश्न अनुत्तरित राहतो.म्हणूनच आता सवाल एकच, सी लिंक उशिरा पूर्ण होण्याची ‘मुदत’ सरकार वाढवणार, पण विलंबाची ‘किंमत’ कंत्राटदाराकडून वसूल करणार कोण हा...?
........
शेअर करा:

More from मुंबई

"राजकीय जन्म" कुणाच्या कृपेने.....? तटकरे-दळवी संघर्षाचा स्फोट; "आम्ही फॉर्म काढला नसता
मुंबई

"राजकीय जन्म" कुणाच्या कृपेने.....? तटकरे-दळवी संघर्षाचा स्फोट; "आम्ही फॉर्म काढला नसता

२९ ऑग, २०२६
मुझफ्फर हुसैनच्या वाढदिवसावर मोफत आरोग्य, डोळ्यांची व कॅन्सर तपासणी शिबीर; 40 अपंगांना व्हीलचेयर वितरित
मुंबई

मुझफ्फर हुसैनच्या वाढदिवसावर मोफत आरोग्य, डोळ्यांची व कॅन्सर तपासणी शिबीर; 40 अपंगांना व्हीलचेयर वितरित

२६ ऑग, २०२६
मेयर डिंपल मेहता यांच्या गुजराती स्वागतावर वाद, मराठी एकीकरण समिती आणि मनसेने आपली आपत्ती व्यक्त केली
मुंबई

मेयर डिंपल मेहता यांच्या गुजराती स्वागतावर वाद, मराठी एकीकरण समिती आणि मनसेने आपली आपत्ती व्यक्त केली

२६ ऑग, २०२६
मंत्रालयातील "मलाईदार" खुर्च्यांवर मुख्यमंत्र्यांचा लवकरच हातोडा....!
मुंबई

मंत्रालयातील "मलाईदार" खुर्च्यांवर मुख्यमंत्र्यांचा लवकरच हातोडा....!

२५ ऑग, २०२६
वृद्धाश्रमांमध्ये टोरेंट पावर कर्मचार्यांनी राखीबंधन साजरा केला, वृद्धांच्या चेहऱ्यांवर हसू उमटला
मुंबई

वृद्धाश्रमांमध्ये टोरेंट पावर कर्मचार्यांनी राखीबंधन साजरा केला, वृद्धांच्या चेहऱ्यांवर हसू उमटला

२५ ऑग, २०२६
‘खड्ड्यांमध्ये जा’ या नार्यांमुळे गूंजले कल्याण नाका, मानवी गणपतीसह राकांपा चे अनोखे प्रदर्शन
मुंबई

‘खड्ड्यांमध्ये जा’ या नार्यांमुळे गूंजले कल्याण नाका, मानवी गणपतीसह राकांपा चे अनोखे प्रदर्शन

२५ ऑग, २०२६