शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६
Englishहिन्दीMarathi
City News Mumbai
City News Mumbai
मुख्यपृष्ठई-पेपरव्हिडिओराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान
टॉपराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान

सिटी न्यूज मुंबई

मुंबईची प्रत्येक बातमी, सर्वात आधी

श्रेणी

  • स्थानिक
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • व्यवसाय
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • आरोग्य
  • शिक्षण

जलद दुवे

  • मुख्यपृष्ठ
  • ई-पेपर
  • व्हिडिओ
  • आजची छायाचित्र
  • आमच्याबद्दल
  • संपर्क करा
  • गोपनीयता धोरण
  • सेवा अटी

न्यूजरूम

  • संपादकीय धोरण
  • सुधारणा आणि तक्रारी
  • आमच्याशी जाहिरात
  • न्यूजरूम संपर्क

भाषा

  • English
  • हिन्दी (Hindi)
  • मराठी (Marathi)

आम्हाला फॉलो करा

Email: citynewsmumbai@gmail.com

Phone: 9869128483

© 2026 City News Mumbai. सर्व हक्क राखीव

Designed and Developed byZeloiteZeloite
"राजकीय जन्म" कुणाच्या कृपेने.....? तटकरे-दळवी संघर्षाचा स्फोट; "आम्ही फॉर्म काढला नसता
  1. मुखपृष्ठ
  2. मुंबई
मुंबई

"राजकीय जन्म" कुणाच्या कृपेने.....? तटकरे-दळवी संघर्षाचा स्फोट; "आम्ही फॉर्म काढला नसता

City News Mumbai•२९ ऑगस्ट, २०२६ रोजी ०३:०९ PM वाजता•10 व्ह्यूज•3 मिनिट वाचा

तर"...दळवींचा जहरी पलटवार.......! महायुतीत मित्रपक्ष...... तरं रायगडमध्ये मात्र "राजकीय हिशेब" चव्हाट्यावर......!


Mumbai, दि.२९(अनंत नलावडे)- राज्यात महायुतीचे सरकार आणि रायगडमध्ये महायुतीतीलच नेत्यांमध्ये उघड राजकीय संघर्ष—हे विरोधाभासाचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्यातील शाब्दिक युद्ध आता पक्षीय मतभेदांच्या पलीकडे गेले असून एकमेकांच्या राजकीय अस्तित्वावरच सवाल उपस्थित करण्यापर्यंत पोहोचले आहे.

काही दिवसांपूर्वी महेंद्र दळवींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत राष्ट्रवादी हा कायम खोडा घालणारा पक्ष असल्याचा आरोप केला होता.भाजप आणि शिवसेनेचे विचार जुळत असल्याचे सांगतानाच आगामी काळात तटकरे कुटुंबाला राजकीय धक्का बसेल,असा इशाराही त्यांनी दिला होता.
दळवींच्या या हल्ल्याला अनिकेत तटकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.आ.दळवींच्या आकलन शक्तीवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी दळवींनी तटकरे कुटुंबाची मदत घेतल्याचा दावा केला. तसेच विधानसभा निवडणुकीच्या काळात दळवींनी मदतीसाठी तटकरे कुटुंबाकडे किती फेऱ्या मारल्या, याचा हिशेब आपल्याला माहीत असल्याचे तटकरे यांनी म्हटले.इतकेच नव्हे, तर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या राजकारणात दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांना अध्यक्षपद मिळावे, यासाठीही दळवींनी तटकरे यांच्याकडे प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला.

यानंतर आ.दळवींचा पलटवार अधिकच आक्रमक झाला."अकलेचे तारे तोडू नयेत", असा टोला लगावत त्यांनी अनिकेत तटकरे यांच्या राजकीय अस्तित्वालाच लक्ष्य केले. त्याहीपुढे जात "सरोगसी बाळ" असा उल्लेख करत दळवींनी अत्यंत जहरी शब्दांत टीका केली.आणि त्यानंतर आलेले विधान रायगडच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले.ते म्हणाले,"आम्ही फॉर्म काढला नसता, तर लढाई झाली असती आणि आम्ही जिंकलो असतो,आणि अनिकेत तटकरे यांचा राजकीय जन्मच झाला नसता".या वक्तव्यामुळे तटकरे-दळवी संघर्ष आता केवळ दोन नेत्यांमधील वाक्‌युद्ध राहिलेले नाही. तरं कोण कुणाच्या राजकीय मदतीने उभे राहिले, निवडणुकीच्या वेळी कोण कुणाच्या दारात गेले आणि स्थानिक सत्तेच्या समीकरणात कोण कुणावर अवलंबून होते, याचा कथित हिशेबच आता सार्वजनिक राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.

रायगडमध्ये महायुतीची "एकजूट" की आतून धुमसणारा संघर्ष......?

पालकमंत्रिपदाच्या वादानंतरही स्थानिक पातळीवरील महायुतीतील मतभेद पूर्णपणे संपले नसल्याचेच या संघर्षातून दिसत आहे. राज्यात सत्तेचे समीकरण एक असले, तरी रायगडमध्ये स्थानिक राजकारणातील स्पर्धा वेगळेच चित्र दाखवत आहे. त्यामीुळे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष महायुतीला किती महागात पडणार, हा आता महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मित्रपक्षांतील ही ‘राजकीय दंगल’ मतपेटीपर्यंत पोहोचली तर रायगडमधील समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

बोॉक्स....

"कोण काय म्हणाले"......?

महेंद्र दळवी | शिवसेना आमदार
“आम्ही फॉर्म काढला नसता, तर लढाई झाली असती आणि आम्ही जिंकलो असतो. अनिकेत तटकरे यांचा राजकीय जन्मच झाला नसता.”तटकरे कुटुंबाच्या राजकीय भूमिकेवर आणि अनिकेत तटकरे यांच्या राजकीय अस्तित्वावर थेट सवाल.

अनिकेत तटकरे | राष्ट्रवादी काँग्रेस आमदार
दळवींच्या आकलनशक्तीवर बोचरी टीका.
तटकरे यांचा दावा.,..विधानसभा निवडणुकीच्या काळात दळवींनी मदतीसाठी तटकरे कुटुंबाकडे अनेकदा फेऱ्या मारल्या. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या समीकरणात ही मदत मागितल्याचा दावा.आता "कोण कुणाला राजकीय मदत करत होते"....?
याच प्रश्नाभोवती तटकरे-दळवी संघर्षाची नवी फेरी फिरताना दिसत आहे.

बॉक्स......

तटकरे-दळवी वादाची टाइमलाइन....

टप्पा १ | पालकमंत्रिपदाचा संघर्ष
रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून महायुतीतील स्थानिक राजकीय मतभेदांना सुरुवातीपासूनच धार.

टप्पा २ | दळवींचा राष्ट्रवादीवर हल्ला
राष्ट्रवादी काँग्रेस "खोडा घालणारा पक्ष" असल्याचा दळवींचा आरोप; तटकरे कुटुंबाला आगामी काळात राजकीय धक्का बसेल,असा इशारा.

टप्पा ३ | तटकरे यांचा पलटवार
दळवींनी राजकीय फायद्यासाठी तटकरे कुटुंबाची मदत घेतल्याचा अनिकेत तटकरे यांचा दावा.

टप्पा ४ | विधानसभा निवडणुकीचा "हिशेब"
दळवी मदतीसाठी किती वेळा तटकरे कुटुंबाकडे आले, याची माहिती असल्याचा तटकरे यांचा दावा.

टप्पा ५ | जिल्हा परिषद अध्यक्षपद
मानसी दळवी यांना अध्यक्षपद मिळावे यासाठी दळवींनी प्रयत्न केल्याचा तटकरे यांचा दावा.

टप्पा ६ | थेट "राजकीय जन्मा" वर हल्ला
दळवींचा आक्रमक पलटवार."आम्ही फॉर्म काढला नसता तर... अनिकेत तटकरे यांचा राजकीय जन्मच झाला नसता".....!

Tyamule आता पुढे काय.......?
महायुतीतील वरिष्ठ नेते हा संघर्ष थांबवणार की रायगडच्या स्थानिक राजकारणात "मित्रपक्ष विरुद्ध मित्रपक्ष" संघर्ष आणखी पेटणार.....he pahane uotsyukyache tharale aahe.karan रायगडच्या राजकारणात "महायुती"पेक्षा "मीच भारी" ची लढाई varachad tharanari asun
राज्याच्या सत्तेत एकत्र...; पण रायगडच्या राजकारणात वर्चस्वासाठी एकमेकांवर वार yamule तटकरे-दळवी संघर्षामुळे महायुतीच्या स्थानिक एकजुटीची खरी परीक्षा asalyache bolale jaate.
.........................(समाप्त)................
शेअर करा:

More from मुंबई

सी लिंक" ला मुदतवाढ.......; जनतेला खर्चाचा भार........? मूळ डेडलाइन २०२४; आता थेट २०२८....!
मुंबई

सी लिंक" ला मुदतवाढ.......; जनतेला खर्चाचा भार........? मूळ डेडलाइन २०२४; आता थेट २०२८....!

२९ ऑग, २०२६
मुझफ्फर हुसैनच्या वाढदिवसावर मोफत आरोग्य, डोळ्यांची व कॅन्सर तपासणी शिबीर; 40 अपंगांना व्हीलचेयर वितरित
मुंबई

मुझफ्फर हुसैनच्या वाढदिवसावर मोफत आरोग्य, डोळ्यांची व कॅन्सर तपासणी शिबीर; 40 अपंगांना व्हीलचेयर वितरित

२६ ऑग, २०२६
मेयर डिंपल मेहता यांच्या गुजराती स्वागतावर वाद, मराठी एकीकरण समिती आणि मनसेने आपली आपत्ती व्यक्त केली
मुंबई

मेयर डिंपल मेहता यांच्या गुजराती स्वागतावर वाद, मराठी एकीकरण समिती आणि मनसेने आपली आपत्ती व्यक्त केली

२६ ऑग, २०२६
मंत्रालयातील "मलाईदार" खुर्च्यांवर मुख्यमंत्र्यांचा लवकरच हातोडा....!
मुंबई

मंत्रालयातील "मलाईदार" खुर्च्यांवर मुख्यमंत्र्यांचा लवकरच हातोडा....!

२५ ऑग, २०२६
वृद्धाश्रमांमध्ये टोरेंट पावर कर्मचार्यांनी राखीबंधन साजरा केला, वृद्धांच्या चेहऱ्यांवर हसू उमटला
मुंबई

वृद्धाश्रमांमध्ये टोरेंट पावर कर्मचार्यांनी राखीबंधन साजरा केला, वृद्धांच्या चेहऱ्यांवर हसू उमटला

२५ ऑग, २०२६
‘खड्ड्यांमध्ये जा’ या नार्यांमुळे गूंजले कल्याण नाका, मानवी गणपतीसह राकांपा चे अनोखे प्रदर्शन
मुंबई

‘खड्ड्यांमध्ये जा’ या नार्यांमुळे गूंजले कल्याण नाका, मानवी गणपतीसह राकांपा चे अनोखे प्रदर्शन

२५ ऑग, २०२६