रविवार, २७ सप्टेंबर, २०२६
Englishहिन्दीMarathi
City News Mumbai
City News Mumbai
मुख्यपृष्ठई-पेपरव्हिडिओराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान
टॉपराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान

सिटी न्यूज मुंबई

मुंबईची प्रत्येक बातमी, सर्वात आधी

श्रेणी

  • स्थानिक
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • व्यवसाय
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • आरोग्य
  • शिक्षण

जलद दुवे

  • मुख्यपृष्ठ
  • ई-पेपर
  • व्हिडिओ
  • आजची छायाचित्र
  • आमच्याबद्दल
  • संपर्क करा
  • गोपनीयता धोरण
  • सेवा अटी

न्यूजरूम

  • संपादकीय धोरण
  • सुधारणा आणि तक्रारी
  • आमच्याशी जाहिरात
  • न्यूजरूम संपर्क

भाषा

  • English
  • हिन्दी (Hindi)
  • मराठी (Marathi)

आम्हाला फॉलो करा

Email: citynewsmumbai@gmail.com

Phone: 9869128483

© 2026 City News Mumbai. सर्व हक्क राखीव

Designed and Developed byZeloiteZeloite
दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबातील मुला मुलींच्या लग्नासाठी शिवसेना देणार मदतीचा हात
  1. मुखपृष्ठ
  2. राजकारण
राजकारण

दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबातील मुला मुलींच्या लग्नासाठी शिवसेना देणार मदतीचा हात

City News Mumbai•२७ सप्टेंबर, २०२६ रोजी ०४:०८ AM वाजता•0 व्ह्यूज•1 मिनिट वाचा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई :- दुष्काळग्रस्त भागातील ज्या शेतकरी कुटुंबात मुला-मुलींचे लग्न ठरलेली आहेत त्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून मदत करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करून त्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते यात मुला मुलींच्या लग्नाचा खर्च कसा करायचा याची विवंचना त्यांना कायम सतावत असते. दुष्काळ, नापीकी,कर्ज यामुळे मुलांच्या लग्नासाठी पैसे उभे करता येणे शक्य नसल्याने अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडतात. त्यांना त्या निर्णयापासून परावृत्त करून याबाबत चिंतामुक्त करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे.

ज्या दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुला मुलींची लग्न ठरली आहेत त्यांनी शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनीधी आणि पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. त्यांना आवश्यक ती मदत शिवसेनेच्या माध्यमातून केली जाईल असे शिंदे यांनी जाहीर केले आहे.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला होता. त्यानुसार आज राज्य शासनाने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून थेट दिलासा देण्यासाठी त्यांच्या मुला मुलींच्या लग्नाला शक्य ती सारी मदत शिवसेनेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
शेअर करा:

More from राजकारण

विधायक मेहता आणि त्यांचे भाऊ इमारतीचे ओसी बदलून 10% हिस्सा! आणि टेरेस फ्लॅटची मागणीचा आरोप
राजकारण

विधायक मेहता आणि त्यांचे भाऊ इमारतीचे ओसी बदलून 10% हिस्सा! आणि टेरेस फ्लॅटची मागणीचा आरोप

२४ सप्टें, २०२६
हाईकोर्टच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप! सरनायकांनी अधिकारींची जबाबदारी ठरवणारी अहवाल मागितला
राजकारण

हाईकोर्टच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप! सरनायकांनी अधिकारींची जबाबदारी ठरवणारी अहवाल मागितला

२४ सप्टें, २०२६
१०८ रुग्णवाहिकांवर मोदींचा ‘फोटो’, जनतेच्या सेवेलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय रंग.......?
राजकारण

१०८ रुग्णवाहिकांवर मोदींचा ‘फोटो’, जनतेच्या सेवेलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय रंग.......?

२४ सप्टें, २०२६
"महसूल प्रशासन आता थेट नागरिकांच्या दारात"......!
राजकारण

"महसूल प्रशासन आता थेट नागरिकांच्या दारात"......!

२४ सप्टें, २०२६
शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; राज्याचे सुलतान देवेंद्र फडणवीसांनी हेक्टरी १ लाख रुपये मदत व सरसकट कर्जमाफी द्यावी: हर्षवर्धन सकपाळ
राजकारण

शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; राज्याचे सुलतान देवेंद्र फडणवीसांनी हेक्टरी १ लाख रुपये मदत व सरसकट कर्जमाफी द्यावी: हर्षवर्धन सकपाळ

२१ सप्टें, २०२६
वाटदच्या प्रस्तावित डिफेन्स क्लस्टरबाबत आठवडाभरात निर्णय; ग्रामस्थांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
राजकारण

वाटदच्या प्रस्तावित डिफेन्स क्लस्टरबाबत आठवडाभरात निर्णय; ग्रामस्थांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

२१ सप्टें, २०२६